Home शेती बाजारभाव Ahilyanagar News : शेवगावमध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्राला सुरुवात

Ahilyanagar News : शेवगावमध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्राला सुरुवात

शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव, भातकुडगाव, अमरापूर, आव्हाणे, बऱ्हाणपूर, आपेगाव, आखतवाडे मळेगाव, सामनगाव, साकेगाव, या भागातल्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली असून,भरघोस पीक सुद्धा आले असताना शासकीय हमीपेक्षाही कमी दराने खाजगी व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना खूप आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते.शेवगावमध्ये शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे,अशी बातमी सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होताच मंगळवारपासून शेवगाव मधील रिध्दी सिध्दी व दुर्गा जिंनींग येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्राला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे समाधान झाल्याचे दिसत आहे.

आता कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे खासगी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कापसाच्या खरेदी दरात निश्चित वाढ होणार आहे.

केंद्र शासनाने शेवगाव प्रमाणेच पाथर्डी जवळील अमरापूरमध्ये सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी केंद्र सुरू केल्यावर त्या तालुक्यातला जास्तीत जास्त कापूस या केंद्रावर आणला जाऊ शकतो.

त्यामुळे शेवगावला कापूस घेऊन जाण्यासाठी वाहनाची होणारी रहदारी तसेच वाहतूक खर्च सुद्धा वाचेल.त्यासाठी शेवगाव प्रमाणेच अमरापूर मध्ये सुद्धा शासकीय कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे,अशी मागणी शेतकरी करत आहे.

शेवगावच्या आणि व पाथर्डीतील शेतकऱ्यांना अमरापूर मध्ये कापूस खरेदी करणे सोयीचे आहे.पाथर्डीत सीसीआय खरेदी केंद्र नसल्यामुळे इथलया शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी शेवगावला जावे लागते,त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो.अमरापूर येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकऱ्यांना त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो