बदलत्या हवामानामुळे वर्षभरापासून लसणाचे भाव वाढले आहेत.बाजारात लसूण चारशे रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.शेवग्याचे भावही वाढले असून ते चारशे ते सहाशे रुपये प्रति किलोला पोहोचले आहेत.हे भाव सर्वसामान्य ग्राहकांच्या अवाक्याबाहेरचे आहेत.ते कधी कमी होणार याच्या प्रतीक्षेत ग्राहक आहेत.
बाजार समितीतील लिलावात शेवग्याला २०० ते २५० रुपये किलोचा भाव मिळत असून,किरकोळ बाजारात मात्र शेवग्याची ३५० ते ४०० रुपये किलो दराने विक्री होत आहे.दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला तसेच हातात आलेल्या शेवग्याच्या शेंगाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.
शेवग्याच्या शेंगा उष्ण असल्याने थंडीत किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी असते असे म्हटले जाते. मागणीच्या तुलनेत सध्या बाजारात आवक फारच कमी झाली आहे.
प्रति किलोला शेवग्याला ३५० ते ४०० रुपये भाव मिळत आहे.त्यामुळे ग्राहकांनीही तसेच हॉटेल व्यावसायिकांनीही शेवग्याच्या शेंगा खरेदीकडे थोडी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
पण मात्र आता शेवग्याने भरपूर भाव खाल्ला आहे.आवक कमी झाल्याने व मागणी वाढल्याने शेवग्याच्या भावात वाढ झालेली आहे.जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याच्या लिलावांमध्ये शेवग्याला २०० ते २५० रुपये किलोचा भाव मिळत आहे.
मात्र,किरकोळ बाजारात शेवग्याला ३५० ते ४०० रुपये किलोचा भाव मिळत आहे.त्यामुळे सध्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.सध्या बाहेरच्या राज्यातून शेवगा विक्रीसाठी येत आहे.राज्यात अल्प प्रमाणात शेतकरी शेवग्याचे उत्पादन घेतात.
परंतु बदलत्या हवामानामुळे शेवग्याच्या झाडावरील फूलगळती झालेली आहे.तसेच शेवग्याच्या झाडावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगाचे उत्पादन कमी आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेवग्याच्या शेंगांच्या उत्पादनावरही ढगाळ हवामान व पावसाचा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता ग्राहकांनाही शेवगा पाहायला देखील मिळत नाही आणि भाव वाढल्यामुळे खाणे सुद्धा परवडणारे नाही.