जिल्ह्यात यंदा रब्बी पिकांनी विशेषतः ज्वारी, गहू, मका या पिकांचे क्षेत्र कमी कालावधीत अधिक प्रमाणात व्यापत असताना करडई (करडी) मात्र अवघ्या २८३ हेक्टरवर आहे.करडई पेरणी अगदीच नगण्य झाली “अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बी पेरणी सरासरी क्षेत्र ४ लाख ५८ हजार ६३६ हेक्टर इतके आहे.जिल्ह्यात खरीप अन् रब्बी हंगामात जवळपास एकसारखेच होते.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून खरीप पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसत आहे.ज्यावर्षी खरीप हंगाम क्षेत्रात वाढ होईल, त्यावर्षी रब्बी क्षेत्र पेरणीवर साहजिकच परिमाण होतो.जून-जुलै महिन्यांत पाऊस चांगला पडला तर शेतकरी खरीप पेरणीवर भर देतात.परतीचा पाऊस चांगला पडला तर रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढते.
जिल्ह्यात यंदा करडई पेरणी अवघ्या २८३ हेक्टरवर झाली आहे.इतर तेलबिया जवस, सूर्यफूल यांचीही अशीच स्थिती आहे. या पिकांच्या क्षेत्रातही कमालीची घट झाली आहे.जिल्ह्यात काही वर्षांखाली करडईचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जायचे.
मात्र, करडई खाण्याचे तेल व पशुखाद्याच्या पेंडींचा वापर वरचेवर कमी होत असल्याने करडईचा पेराही कमी होत आहे. तसेच इतर जास्त उत्पादन,जास्त पैसे मिळवून देणाऱ्या पिकांकडे विशेषतः रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.
अगदी कमी पाण्यावर येणारे करडई पीक असले तरी ऑइल कंपन्यांकडून करडईपेक्षा इतर खाद्यतेल शिवाय करडईपेक्षा कमी दरात उपलब्ध करून दिले जाते.करडईची काढणी व मळणीचे काम जिकिरीचे आहे.मजूर मिळत नसल्याची अडचण आहे.त्यामुळे पिकाचे क्षेत्र घटत आहे.
करडईचे क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केला जातो.मात्र, शेतकऱ्यांकडून प्रतिसाद कमीच मिळतो.गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांकडून अत्यल्प पेरणी केली जात आहे.शेतकऱ्यांचा गेल्या काही वर्षात रब्बी हंगामात कांदा, हरभरा, गहू अशा पिकांकडे कल वाढल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.