बाजारपेठेत काळ्या मनुका ५०० रुपयांहून अधिक दराने विक्री होत असून, लसणाचे दरही ३२० ते ३५० रुपयांवर आले आहेत.लसूण,अद्रकचे वाढलेले दर पाहता रोज फिके वरण खाणार काय,असा सवाल गृहिणी करू लागल्या आहेत. वातावरणातील बदलांमुळे यंदा लसूण,अद्रकसह इतर भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे.
असे असले तरी विविध प्रकारच्या भाज्या करण्यासाठी लसूण, अद्रकचा वापर केला जातो. बाजारपेठेत ४०० रुपयांवर गेलेले लसणाचे दर सध्या ३२० ते ३५० रुपयांवर आले आहेत, तर अद्रक ८० ते १०० रुपये किलोने विक्री होत आहे.
दुसरीकडे ड्रायफ्रूट असणारे विविध प्रकारचे मनुके ५०० ते ८०० रुपये किलोपर्यंत आहेत.ड्रायफ्रूटचे दर आणि लसणाचे दर सारखेच झाले आहेत.परिणामी वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असून, भाजी लसूण-अद्रकच्या पेस्टविनाच करावी का, असा प्रश्नही पडत आहे.
भाजीला चव यावी म्हणून विविध मसाल्यांची फोडणी दिली जाते.परंतु, लसूण आणि मसाल्यांचे दर पाहता डोक्यात तडतड होऊ लागते.भाजी करण्यासाठी विविध मसाले वापरले जातात.परंतु, मीठ वगळता इतर विविध प्रकारच्या मसाल्यांचे दरही गत काही दिवसांमध्ये वाढल्याचे चित्र आहे.
गत काही दिवसांत लसणाचे दर अधिक वाढले आहेत.वाढलेले दर पाहता लसणाची पाकळी ड्रायफ्रूटला भारी असे म्हणण्याची वेळ आली आहे.लसणाचे दर ३२० ते ३५० रुपयांवर आले आहेत.
वाढलेले लसणाचे दर पाहता आता लसूण फ्रायचे नावही कोणी घेत नाही.गत काही दिवसांपासून लसूण,अद्रकची बाजारपेठेत आवक कमी आहे.आवक कमी असल्याने दरवाढ दिसत आहे.बाजारात आवक वाढली की दर कमी होतील.
यंदा लसणाचे उत्पादन सरासरीच्या तुलनेत अधिक प्रमाणात घटले आहे.इतर राज्यातून आणि विदेशातून होणारी आयातही घटलेली आहे.त्यामुळे बाजारपेठेतच आवक नसल्याने लसणाचे दर वाढले आहेत.
४०० रुपयांवर गेलेले दर गत दोन दिवसांत ३२० ते ३५० रुपयांवर आले आहेत.विविध भाज्यांमध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट करून वापरली जाते. मात्र, लसूण ३५० रूपये तर अदक ८० ते १०० रुपये किलोवर गेली आहे