वाढत्या थंडीमुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे पुणतांबा परिसरातील दुधाचे दर खूप कमी मिळत असून पशूखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत.त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी तिहेरी संकटात सापडला असून दूध धंदा सोडून देण्याची मनस्थितीत अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.

त्यामुळे दुधाचा भाव वाढविण्याची मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून निवडणूक काळात शासनाने शेतकऱ्यांचे भले करण्याची अनेक आश्वासने दिली.महाराष्ट्रात निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळाले असून अजूनही सत्ता स्थापन करण्यात आली नाही.

त्यामुळे सध्या दुधाचे भाव कमी झाल्यामुळे न्याय कुणाकडे मागावा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.पुणतांबा परिसरातील शेतकऱ्यांनी शाश्वत व्यवसाय म्हणून गायी, म्हशी खरेदी करून दूध उत्पादन सुरू केले.परंतु दुधाला शास्वत भाव कधीच मिळाला नाही.

तरीही शेतीला पर्यायी व्यवसाय म्हणून शेतकऱ्यानी दूध उत्पादन चालूच ठेवले परंतु सध्याचे शासन अनुदानासह दुधाचे २७ ते २८ रुपये दर मिळत असून थंडी वाढल्यामुळे दूध उत्पादनात देखील घट झाली आहे.

त्यामुळे शेतकरी तिहेरी संकटात सापडले असून पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडल्या आहे.सरकारने पशुखाद्याचे दर नियंत्रीत करण्याची गरज आहे असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उलट दुधाचे दर कमी होत आहे.पशुखाद्याचे दर त्या तुलनेत प्रचंड वाढले आहे.राज्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे गायी म्हशींच्या दूध देण्याच्या क्षमतेत घट झाली आहे.

शिवाय दुधाचे भाव सुद्धा कमी झालेत.त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे दूध व्यवसाय सोडून देण्याच्या मनस्थितीत आहे.राज्य सरकारने दुधाचे भाव वाढू देण्याची मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.