यंदाच्या थंडीत बाजरीच्या भावात वाढ झाली आहे.परंतु बाजरी खाण्याच्या फायद्यामुळे बाजरीच्या मागणीत सुद्धा वाढ होताना आपल्याला बघायला मिळत आहे.दिवाळीपासून बाजरीची मागणी चांगलीच वाढली आहे.जिल्ह्यातील पारनेर, अहिल्यानगर, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांत बाजरीचे उत्पादन घेतले जाते.
यंदा पावसामुळे उत्पादन कमी झाल्यामुळे जिल्ह्यात यंदा बाजरीची आवक होण्याची अधिक शक्यता आहे.बाजरीच्या दरांमध्ये कमी- अधिक प्रमाणात वाढ होत असूनही बाजारात आवक चांगली आहे.येत्या काळात आवक आणखी वाढेल.
थंडीत वाढ होत असताना बाजारात धान्याच्या दरावरही परिणाम होत आहे.यात बाजरीच्या दरात कमालीची वाढ झाली असून अहिल्यानगर बाजार समितीत शनिवारी बाजरीला व्यापाऱ्यांनी २ हजार २०० ते ३ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दर देत शेतकऱ्यांकडून खरेदी केली.
दुसरीकडे किरकोळ बाजारातही बाजरी ३५ आणि ४० रुपये प्रतिकिलो या दरात उपलब्ध आहे.होलसेल बाजारात मात्र तीन हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे.येत्या काळात या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्यदायी असते त्यामुळे बाजरीला बाजारात मागणी वाढते.यंदाही ही स्थिती निर्माण झाली असून,बाजारात दिवाळीपासून बाजरीचे दर वाढल्याचे सातत्याने समोर येत आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत यंदा बाजरीचे उत्पादन कमी झाल्यानेही दरात वाढ झाल्याची माहिती आहे.सद्यःस्थितीत बाजारात तुरळक आवक आहे.जिल्ह्यात यंदा मोजक्याच भागात बाजरीचे उत्पादन आहे.
बहुतांश शेतकरी घरापुरते बाजरीचे उत्पादन घेतात.यामुळे मागणी तेवढा पुरवठा नसल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून मिळत आहे.येत्या काळात आवक वाढल्यास दर कमी होण्याची शक्यताही व्यापारी व्यक्त करीत आहेत.
हे आहेत बाजरी खाण्याचे फायदे
बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम असल्यामुळे शरीराबरोबरच हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.बाजरी खाणे डायबिटीसच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरते.बाजरीतील पोषक तत्त्व डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचे आहारतज्ज्ञांचे मत आहे.शिवाय वजन कमी करू पाहणाऱ्यांना सुद्धा बाजरीमुळे फायदा होऊ शकतो.