लसूण हा मानवी आहारातील महत्वाचा घटक असून त्यामुळे जेवनाची लज्जत वाढते.शाकाहरी असो वा मांसाहरी, लसणाच्या फोडणी शिवाय जेवणाला चवच येत नाही.परंतू वर्षभरापासून बाजारात लसणाची आवक घटल्याने ग्राहकांच्या खिशाला दरवाढीची फोडणी बसत आहे.
मागील दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यामुळे लसणाचे दर पडले होते.पुरवठा जास्त व मागणी स्थिर असल्यामुळे लसणाला कमी भाव मिळत होता,त्यामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी लसून लावडीकडे पाठ फिरवली त्यामुळे बाजारात लसणाची आवक घटल्याने दर गगनाला भिडले आहेत.
किरकोळ बाजारात सध्या चारशे रुपये प्रतिकिलो दराने लसून विकला जात असून भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.स्वयंपाक घर, हॉटेल, ढाब्यावरील भाज्यांना लसणाचा वास दिला जात आहे.
लसणाला अनन्यसाधारण महत्व आहे.यंदा लसणाची आवक कमी झाल्याने दर वाढत आहेत.जुन्या लसणाची आवक जवळपास संपली असून नवीन लसून लागवड चालू आहे,त्यामुळे बाजारात लसूण उपलब्ध नसल्याने दर प्रचंड वाढते आहेत.
भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी लसणाची लागवड करीत आहेत, पण जपूनच कारण जास्त लागवड झाली तर उत्पादन वाढून भाव पुन्हा कोसळतील अशी भिती शेतकऱ्यांना आहे.
कोणत्याही प्रकारची भाजी चटकदार होण्यासाठी लसणाची फोडणी अत्यावश्यक असते, मात्र हा लसून महागल्याने फोडणीही महागली आहे.
यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.स्वयंपाकात लसणाचा उपयोग करावा की नाही असा प्रश्न भेडसावत आहे लसणा शिवाय डाळींची, भाजीची फोडणी पूर्ण होत नाही,त्यामुळे थोडा का होईना लसून खरेदी करावा लागतोय.
मुख्यतः महाराष्ट्रात मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात व हिमाचल प्रदेश येथून लसणाची आवक होते त्यामुळे भाव वाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.