Ahilyanagar News : श्रीगोंदे तालुक्यात १५ मे रोजी मध्यरात्री विजेच्या कडकडासह अवकाळी झाल्याने उष्णतेची लाट अंशतः थंडावली. मात्र, उकाडा दिवसभर कायम आहे. दर्यान मागील दोन दिवसांत श्रीगोंदे तालुक्यात १०९ मिलीमीटर पावसाचीनोंद झाली.
अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकर्यांना बसला आहे. शेतकऱ्यांचा काढणी करून ठेवलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले. एकीकडे कांद्याचे भाव निर्यात बंदीमुळे दहा ते बारा स्पवे प्रतिकिलो झाला.
तर कांद्याच्या उत्पादनातही घट झाली. अनेक शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस उघड्यावर ठेवलेला कांदा सुरक्षित झाकण्यासाठी दिवसाची रात्र केल्याचे शेतकरी सांगतात. चालू वर्षी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने विहिरीवर कुपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे. अंतिजाणतेमुळे उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.
त्यामुळे गावोगावी पिण्याच्या पाण्यासा जनावरांच्या पाण्याचा प्रयन गंभीर बनला, मात्र रुमे रे रोजी मध्यरात्री अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला.
तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे बांगदरी, चिंबळा, हंगेवाडी या परिसरात विद्युत पोल कोलमडले असून झाडे पडली. त्यामुळे परिसरात दोन दिवसांरासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. जमिनीत सध्या तरी गारवा निर्माण झाला. परंतु दिवसभर उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
दरम्यान, पावसाळी हंगाम काळी दिवसांवर येऊऊन ठेपला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोकळ्या जमिनीतील नांगरटीसह पुढील खरिपाच्या पिकासाठी जमिनीच्या मशागती करून ठेवाव्यात. या कालावधीत शेतकरी कपाशी, बाजरी, तूर, मूग व विविध प्रकारचे कडधान्याची पेर या पावसाच्या धरतीवर शेतकरी करतात.
त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन सुपेकर यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर म्हणाले, २२ ते २५ तारखेपर्यंत अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला. त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांनी उन्हाळी हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीगोंद्यात मंडलनिहाय झालेला पाऊस
श्रीगोंदे तालुक्यातील आठ मंडलात १५ मे रोजी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये श्रीगोंदे १३.५ मिमी, काष्टी २५४, मांडवगण २.५, बेलवंडी ९.३, पेडगाव ७८, चिंभळा ९.३, देवदैठण १७.८, तर कोळगाव मंडलमध्ये सर्वात कमी १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. श्रीगोंदे तालुक्यात एकूण पावसाची सरासरी १०९ मिलिमीटर झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी दिली