करंजी मुख्यमंत्री पद मला नको, दुसऱ्या कोणाला द्या, असे म्हणत माजी आमदार स्व. बाबुराव भापसे यांनी १९८२-८३ साली चालून आलेली मुख्यमंत्री पदाची संधी सोडली.

पाथर्डी हा मुख्यमंत्रीपद नाकारणारा तालुका असून, या तालुक्यातील राजकारणी लोक स्वाभिमानी आणि मोठ्या मनाचे आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रसाद लाड यांनी केले.

माजी आमदार बाबुराव भापसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त निंबोडी येथील भापसे विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शन व बाल आनंद मेळाव्याची सांगता आमदार लाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

या वेळी क्रिस्टल ग्रुपच्या अध्यक्षा पवार, संगीता भापसे, कुणाल भापसे, माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, शिवाजी पालवे मेजर, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार, सरपंच इलियास शेख, अजित देवडे, शबाना शेख,

बाळासाहेब कचरे, कुंडलिक भापसे, कुंडलिक मचे, शिवाजी मचे, ग्रा.पं. सदस्य डॉ. काशिनाथ ससाणे, अमोल भुजबळ, बिस्मिल्ला शेलार, संतोष चोभे,

सुमित दरंदले, नारायण कराळे, राजेंद्र म्हस्के, प्रवीण शिंदे, मिनीनाथ शिंदे, नवनाथ आरोळे, विशाल कराळे यांच्यासह ग्रामस्थ व पालक लाड म्हणाले, मुख्यमंत्री पदासाठी राजकारणात वाटेल ती भूमिका घेणारे राजकारणी आपण नेहमी पहातो;

परंतु मुख्यमंत्री पद मला नको दुसऱ्या कोणाला द्या, असे म्हणत १९८२-८३ साली माजी आमदार स्व. बाबुराव भापसे यांना काँग्रेसचे तत्कालीन नेते बुटासिंग यांनी भापसे यांना उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची तयारी करा, असे कळवले.

मात्र. भापसे यांनी स्पष्टपणे सांगितले, मी शिक्षित नाही, राज्य चालवण्यासाठी सुशिक्षित व्यक्तीला संधी द्या, असे म्हटल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ बेलिस्टर बाळासाहेब भोसले यांच्या गळ्यात पडली आणि ४२ वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्याला चालून आलेली मुख्यमंत्री पदाची संधी हुकली.

निंबोडीला यापूर्वी दोन आमदार होते, आता जावयाच्या रुपाने या गावचा तिसरा आमदार होण्याचा मान भाजपामुळे मला मिळाला, असे ते शेवटी म्हणाले. सूत्रसंचालन अंजली पाठक व सचिन साळवे यांनी केले. मुख्याध्यापक नंदकुमार लोखंडे व सागर आरोळे यांनी