Ahilyanagar News : प्रत्येकास काहीतरी प्रकारचे व्यसन असते, मात्र अनेकांच्या याच व्यसनामुळे आयुष्यात फार मोठे बदल होतात. तसे जर व्यसन चांगले म्हणजे वाचन किंवा इतर प्रकारचे असेल त्याची प्रगती होते अन जर व्यसन चुकीचे असेल तर त्या व्यक्तीची अधोगती होते. जसे दारू पिणे आरोग्यास हानिकारक असते मात्र तरी देखील अनेकजण दारू पितात. यातून बऱ्याचवेळा वाद देखील होतात.
असाच दारू पिण्यासाठी मज्जाव केल्याने संताप अनावर झाल्याने रंगाच्या भरात पतीच्या हातून खूप मोठी चूक झाली. ज्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंबच उद्धवस्त झाले आहे.
त्याचे झाले असे पतीला दारू पिण्याचे व्यसन होते मात्र पत्नी शक्य त्या वेळी त्याला दारू पिण्यापासून रोखत होती. मात्र त्यामुळे पतीला तीच खूप राग येत असे,असाच १८ डिसेंबर रोजी पती गावात दारू पिण्यासाठी जात होता मात्र त्याला जाण्यास मज्जाव केला.
त्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घालून तिची हत्या केली. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. याबाबत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिलेचा भाऊ मल्हारी हरिभाऊ दरंदले (रा. कौठा, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, त्यांची बहिण सुशिला शिवनाथ भवर (वय ३२) रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर हिने १८ डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास तिचा पती शिवनाथ कारभारी भवर हा गावात दारू पिण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन निघाला असता तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
त्याचा राग येवून त्याने तिच्या अंगावरून ट्रॅक्टर घातला. त्यात तिचा दर्दैवी मृत्यू झाला.या फिर्यादीवरून शिवनाथ कारभारी भवर याच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कलम १०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी करत आहे.