Ahilyanagar news : वातावरणातील बदलाने फळबागांवर डाऊनी, भुरी, करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. यावरील महागड्या औषधांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. चालू वर्षी पिकाचा खर्च आणि उत्पन्न यात मोठी तफावत होणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिके, तसेच फळबागांवर मोठा दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दोन दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. मागील दोन तीन दिवसांपासून विविध भागात ढगाळ वातावरण असून, मंगळवारी अनेक भागात रिमझिम पाऊस पडला. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे. कधी कडाक्याची थंडी तर धुके तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
गेल्या पंधरवड्यात कडाक्याची थंडी पडल्याने पिकांच्या वाढीसाठी चांगली मदत होण्याच्या आशेने शेतकरी सुखावला होता. मात्र, या आठवड्यात थंडी ओसरून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरण असल्याने ज्वारी, हरभरा, कांदा, या उभ्या पिकांवर रोगाचा प्रार्दुभाव होऊन पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर डाऊनी, भुरी, करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. वातावरण ढगाळ झाल्याने फुलोरा अवस्थेमध्ये असलेल्या द्राक्ष पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.
वातावरणातील दिवसेंदिवस होणारा चढ-उतार, या पिकांना घातक ठरू शकतो. आधीचमोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. वातावरण ढगाळ झाल्याने फुलोरा अवस्थेमध्ये असलेल्या द्राक्ष पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.
शेतकरी विविध संकटातून मार्गक्रमण करत असताना दुसरीकडे मात्र वातावरणातील चढ-उतारामुळे शेती पिकांची वाताहात होताना दिसत आहे.