Ahilyanagar Breaking : नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणातील आणखी एक सुरस कथा समोर आली आहे. संगमनेर येथील उद्योजकाने स्वतःसह मुलगा व पत्नीच्या नावे असलेल्या कंपन्यांसाठी 33 कोटीचे कर्ज घेतले असून, ते परत केलेले नाही.
दरम्यान आरोपी अमित वल्लभराय पंडित ( वय ५६ रा. संगमनेर कॉलेज समोर, ऐश्वर्या पेट्रोल पंप मागे, नाशिक पुणे रोड , ता. संगमनेर) याला सात दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे
नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणी अमित वल्लभराय पंडित याला संगमनेर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला रविवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. यावेळी पोलिसांनी तपासाची माहिती दिली. सरकारी पक्षाच्या वतीने अँड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली.
बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी करण्यात आलेल्या फॉरिन्सिक ऑडिटमध्ये आरोपी अमित पंडित याचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झालेले आहे. पंडित याने त्याचे मेसर्स परिस इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नावे मशिनरी खरेदी करिता
टर्म लोन म्हणून ९ कोटी, त्यांचे पत्नीच्या नावे असलेली मे. पुष्कराज ट्रेडिंग कंपनीचे नावे कॅश क्रेडिट करिता १२ कोटी, मुलगा सात्विक अमित पंडित भागीदार असलेले पुष्कराज इस्पात इंडिया एल.एल. पी. च्या नावे कॅश क्रेडिट करिता १२ कोटी रुपये, असे एकूण 38. कोटीचे कर्ज नगर अर्बन बँकेकडून घेतलेले आहे.
आरोपीचे मेसर्स परिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावे मशिनरी खरेदी करिता नगर अर्बन बँकेकडून टर्म लोन म्हणून घेतलेले कर्ज हे मशिनरी ‘खरेदीकरता न वापरता खासगी बँकेचे कर्ज भरण्याकरिता वापरले.
तसेच स्वतःच्या नावे. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पत्नी व मुलीच्या, मुलाच्या नावे असलेल्या कंपनीच्या नावे घेतलेले कर्जही वापरलेले आहे. या शिवाय मुलगा सात्विक पंडित हा. भागीदार असलेले पुष्कराज इस्पात लिमिटेड कंपनी लि. कंपनी विकण्याचा करार झाल्यानंतरही याच कंपनीच्या नावे बँकेकडून कर्ज घेऊन फसवणूक केली आहे.
पत्नी सपना पंडित यांच्या नावे असलेले पुष्कराज ट्रेडिंग कंपनीचा भागीदार विक्रीचा व्यवहार खूप कमी असतानाही व कंपनीमध्ये स्वतःचे भांडवल नसतानाही बँकेला चुकीची माहिती देऊन नगर अर्बन बँकेकडून अधिकारी, पदाधिकारी व संचालक यांच्याशी संगनमत करून १२ कोटीचे कर्ज घेतले व ते थकीत ठेवलेले आहे.
नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणांमध्ये अमित पंडित हे १८ नंबरचे आरोपी आहेत. कर्ज परतफेडीची क्षमता नसताना कर्ज प्रकरण तपासून त्यांना वेगवेगळ्या कंपनीच्या नावे कोटी रुपयांची कर्ज मंजूर करण्यात आलेली आहे. हे कर्ज मंजूर करण्यासाठी त्यांना कोणी मदत केली, या कर्जातून त्याच्यासह आणखी कोणाला ‘किती लाभ मिळाला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
पंडित याने स्वतःचा मुलगा व पत्नीच्या नावे बँकेकडून घेतलेल्या कर्जामध्ये अन्य कुणाला फायदा झाला आहे का? बँकेकडून मंजूर झालेले कर्ज हे कशा पद्धतीने मंजूर झाले. त्यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का?, याबाबत तपास करायचा आहे. परंतु आरोपीकडून कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नाही. त्यामुळे आरोपीला पुढील सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली.