Ahilyanagar Rain : अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे ४१.४९ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले असून, यामध्ये सर्वाधिक नुकसान डाळिंब व लिंबू या फळ पिकांचे झाले आहे.
नगर शहर व जिल्ह्यात गेल्या मंगळवारपासून कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पावसामुळे अकोले कोपरगाव कर्जत तालुक्यात मोठे नुकसान झाले असून,
कर्जत तालुक्यात २०, कोपरगाव तालुक्यात ४, श्रीगोंदे ३, तर पारनेर, पाथर्डी तालुक्यात प्रत्येकी एका घराची पडझड झाली आहे. या तालुक्यामध्ये फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,
कोपरगाव तालुक्यात २८.४१, कर्जत तालुक्यात ८.२३, अकोले तालुक्यात १.२० व श्रीगोंदे तालुक्यात ३ असे ४१.४९ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, नगर, पारनेर या तालुक्यात देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
प्रतीक्षा पंचनाम्याची अवकाळीमुळे पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नुकसानीच्या पीकांचे पंचनामे करण्याची प्रतीक्षा लागली आहे.