विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर बरेच गोंधळ होत असतात.तरुणांच्या गटात,राडा हाणामारी होत असतात त्या हाणामारीमागे बऱ्याच वेळा राजकीय गोष्टींचा प्रभाव असतो.अशीच एक घटना कुपवाड मध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती.या घटनेची सविस्तरपणे माहिती अशी कि,फिर्यादी विजय घाडगे यांना श्रीकांत जाधव याने हाणामारी केली.
फिर्यादी जखमी विजय घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवार दि. १९ रोजी सायंकाळी नवजीवन नगर अहिल्यानगर येथे फिर्यादी विजय घाडगे हे श्रीकांत गोसावी उर्फ जाधव यांचे घरासमोर जाऊन त्यांच्यासह रफिक शेख, भोराप्पा आमटे यांना, तुम्ही आमच्या लोकांची वाहने अडवून त्यांना दमदाटी का करत आहात? असे त्यांना विचारले.
त्यावेळी संशयित श्रीकांत जाधव याने,आम्ही आमच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहोत त्या निवडून आल्या नाहीत तर तुमच्या कार्यकर्त्यांना बघून घेतो अशी धमकी देत त्याच्या नऊ संशयित साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्याना दुसऱ्या पक्षाचा प्रचार करीत असल्याचा राग मनात धरून हाताने, काठी, लोखंडी रॉडने डोक्यात अंगावर मारून व चाकूने, हातावर मारून, जखमी केले असल्याची तक्रार घाडगे यांनी दाखल केली.
याप्रकरणी श्रीकांत गोसावी उर्फ जाधव, रफिक शेख, गोराप्पा आमटे, आकाश गोसावी, चिच्या (पूर्ण नाव माहित नाही), किरण पाटील, अब्बास (पूर्ण माहित नाही), अमीन शेख, धनाजी बुधनुर (रा. सर्व अहिल्यानगर) याच्यावर कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान फिर्यादी श्रीकांत गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रीकांत गोसावी यांचे नवजीवननगर अहिल्यानगर येथील घराकडे येऊन विजय घाडगे यांनी, तुम्ही अपक्ष उमेदवाराचा प्रचार करायचा नाही तुम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचार करायचा असे म्हणाले.
तेव्हा त्याला फिर्यादी गोसावी यांनी नकार दिल्यानंतर विजय घाडगे व त्यांचे साथीदारांनी फिर्यादी श्रीकांत आणि त्यांचा भाऊ आकाश गोसावी व सहकाऱ्यांना हाताने लाथाबुक्याने मारहाण केली तसेच अभिषेक गोसावी यांनी फिर्यादी यांचा मित्र प्रशांत यादव यास पाठीत चाकूने मारून त्यास जखमी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी विजय घाडगे, पवन घाडगे, सागर घाडगे, शुभम गोसावी, शफिक शेख, अभिषेक गोसावी, महबूब नदाफ, तोफिक मुल्ला, वाजीद मुलाणी, पिराजी गोसावी, सचिन घाडगे, सुनील घाडगे, शामराव घाडगे (सर्व रा. अहिल्यानगर कुपवाड) यांच्यावर कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या प्रचाराच्या कारणांवरून या दोन गटात लाथाबुक्या, काठी आणि चाकूचा वापर करत झालेल्या हाणामारीत दोन्ही गटांचे पाच जण जखमी झाले. या हल्ल्यात माजी उपमहापौर विजय घाडगे हे जखमी झाले.याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद कुपवाड पोलीस ठाण्यात दाखल झाली असून.याप्रकरणी एकूण २२ जणांवर कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.