गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चालू असलेल्या नेत्यांच्या प्रचारतोफा सोमवारी (१८ नोव्हेंबर) थंडावल्या होत्या. आज २० नोव्हेंबरला (बुधवारी) पार पडले आहे.सकाळच्या टप्प्यात मतदानाला अल्पसा प्रतिसाद मिळत होता; परंतु टप्प्याटप्प्याने मतदानाचा टक्का वाढत गेला.

सायंकाळी ६ वाजेनंतर बऱ्याच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.रात्री उशिरा मतदानाची आकडेवारी मिळाली.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे ५ टक्के मतदान कमी झाले असून असले तरी मतदान मात्र साडेपाच हजाराने वाढले आहे.

बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली; परंतु थंडी असल्याने पहिल्या टप्प्यात अल्पसा प्रतिसाद मिळत होता.नंतर सातत्याने त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली.या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीत लढत होत आहे.

पहिल्या चार तासांत सकाळी ११ वाजेपर्यंत (२१.१%) मतदान झाले आहे. यात पुरुष ३६ हजार २५८ तर महिला २५ हजार १ व इतर एक असे एकूण ६१ हजार २६० इतके मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत (३६.९६ %) मतदान झाले होते.

एकूण १ लाख ७ हजार ५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी तीन वाजेपर्यंत (५२.३९.%) मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत (६५.८०%) तर शेवटच्या टप्प्यात सहा वाजेपर्यंत आठ टक्के मतदान वाढले.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात (७१.४९%) मतदान शांततेत पार पडले. यात पुरुष १ लाख ७ हजार ३९४ व महिला ९९ हजार ६७९ तर इतर चार असे एकूण २ लाख ७ हजार ७७ इतके मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळके व सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी दिली.

मतदारसंघातील २७२ मतदान केंद्रांवरुन मतदान प्रक्रिया पूर्ण करुन परतणारे मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी, पोलीस शिपाई यांचे गुलाब पुष्प देवून निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंकी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक सागर देशमुख, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, कोपरगांवचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी स्वागत केले.

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान केंद्रावरील साहित्य संकलनाचे काम कोपरगाव येथील सेवा निकेतन स्कूल येथे सुरू होते. या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.