Ahilyanagar News : मुंबई आणि पुण्याप्रमाणेच अहिल्यानगर शहरातही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. अहिल्यानगर शहरा जवळील केडगाव उपनगरामध्ये देखील गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्येचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण, वाढत्या नागरीकरणामुळे केडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात जागेची टंचाई भासत आहे.
या परिसरात आता निवासासाठी जागेची टंचाई भासत असून यामुळे मुंबई आणि पुण्याच्या धरतीवर नवीन हरित केडगाव विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. म्हणजेच आता केडगावचा विस्तार होणार अन नवीन केडगाव तयार होईल.
यामुळे नागरिकांना निवासाचा योग्य उत्तम पर्याय उपलब्ध होणार असून निवासासाठी असणारी जागेची टंचाई दूर होईल असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होत आहे. केडगाव बायपासनजीक खाजगी विकासकांच्या माध्यमातून नवीन हरित केडगाव साकारले जात आहे.
या परिसरातील जवळपास 100 हेक्टर क्षेत्र आहे अन याच क्षेत्रावर निवासी प्रकल्पांची बांधकामे होणार आहेत. रस्ते, वृक्षारोपण, क्लब, शॉपिंग सेंटर यासह रहिवाशांसाठी सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा या ठिकाणी विकसित केल्या जात आहेत. मंडळी, नगर शहराचे प्रवेशद्वार म्हणून केडगावची ओळख.
हेच केडगाव सध्या नगर शहरातील सर्वात मोठे उपनगर म्हणून विकसित झाले आहे. केडगाव परिसरातील जवळपास 90 टक्के क्षेत्र हे बिगर शेती म्हणजेच एनए करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. तसेच केडगाव परिसराचा विस्तार देखील झपाट्याने होतोय.
आता मुंबई पुणे प्रमाणेच अहिल्यानगर मध्येदेखील नवीन केडगाव विकसित होत असून यामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. खरेतर, केडगाव मधील पाण्याचा प्रश्न हा नुकताचं सुटला आहे आणि यामुळे या ठिकाणी घर घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चांगली आहे.
सध्या केडगावची लोकसंख्या ही एक लाखाच्या वर गेली आहे. रांजणगाव व सुपा एमआयडीसीचा विस्तार झाला आणि याचाही फायदा केडगाव उपनगराला होतोय. या दोन्ही एमआयडीसीच्या विस्तारामुळे केडगाव परिसरात भरभराट आली आहे.
केडगाव येथून या दोन्ही एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी नागरिकांना चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे आणि हेच कारण आहे की या दोन्ही एमआयडीसीमध्ये कामाला असणारे बहुतांशी लोक केडगावमध्ये राहण्याला प्राधान्य दाखवत आहेत. या ठिकाणच्या निवासी प्रॉपर्टीच्या विक्रीमध्ये याच कारणांमुळे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ नमूद करण्यात आली आहे.
मात्र यामुळे जागेची टंचाई भासत असून यामुळे नव्या निवासासाठी जागा अपुरी पडत आहे. हेच कारण आहे की केडगाव बायपास लगत नव्या केडगावची निर्मिती होत आहे. जवळपास 1000 कुटुंबाची निवास व्यवस्था होऊ शकेल या अनुषंगाने नव्या केडगाव मध्ये निवास प्रकल्प सुरु होत आहे.
यासाठी स्वातंत्र वीज प्रकल्प, व स्वातंत्र्य सांडपाणी निचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प येथे साकारण्यात येत आहे. नगर क्लबच्या धर्तीवर केडगाव क्लब ची उभारणी या ठिकाणी सुरू आहे. यामध्ये नागरिकांसाठी आवश्यक सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. नव्या केडगाव साठी नवीन पाण्याची टाकी सुद्धा तयार केली जाणार आहे.