प्रत्येक लाभधारकाला पाणी मिळणार असून प्रत्येकाच्या पाझर तलावात पाणी पोहोचणार आहे.त्यामुळे कोणीही मुख्य पाईपलाईन अथवा एअरवाल फोडण्याचा प्रयत्न करू नका,मागील पाच वर्ष मिरी लाईनला एकदाही पाणी पोहोचले नाही त्यामुळे यावेळी प्राधान्याने मिरी लाईनसाठी पाणी सोडले जाणार असल्याचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.
राहुरी, नगर, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील ४५ गावांमधील १०२ पाझर तलावासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीला गुरुवारी मुळा धरणातून त्यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले.
यावेळी कर्डिले म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यात करंजी लाईन त्यानंतर चिचोंडी शिराळ कोल्हार नंतर नगर तालुक्यातील खोसपुरी पांगरमल परिसर त्यानंतर वांबोरी परिसरातील सर्व पाझर तलामध्ये पाणी टप्प्याटप्याने सोडले जाणार आहे.
शेतकरी हिताचा निर्णय घेत राहुरी,नगर, पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे ठरवले.लाभधारक प्रत्येक तलावात पाणी पोहोचले पाहिजे.
सर्वांना पाण्याचा लाभ झाला पाहिजे हा या मागचा हेतू असून वांबोरी चारी योजनेचे साडेपाच कोटी रुपये विज बिल थकलेले असताना देखील राज्यात महायुती सरकार पुन्हा एकदा आल्यामुळे या योजनेला पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले.
ही योजना यापुढे सुरळीत सुरू राहावी,यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विज बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करणार आहे.
ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता राजेंद्र पारखे, शाखा अभियंता गर्जे, ज्येष्ठनेते बाळासाहेब बानकर, तानाजीराव धसाळ, मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे, व्हाईस चेअरमन रभाजी सुळ
ज्येष्ठनेते सुरसिंग पवार, सुरेश बनकर, संचालक हरिभाऊ कर्डिले, संभाजीराव पालवे, एकनाथ आटकर, वैभव खलाटे, संतोष शिंदे, दीपक कार्ले, संतोष म्हस्के, रवींद्र म्हस्के, नारायण आव्हाड, धनंजय गाडे, अमोल भनगडे, दत्ता तापकिरे
संजय गिरवले, सुभाष निमसे, भाऊसाहेब ठोंबे, शिवाजी साठे, देवेंद्र लांबे, आर आर तनपुरे, मंजाबापू घोरपडे, अशोक उंडे, कैलास पवार, सुभाष गायकवाड, वैभव खलाटे, हनुमंत घोरपडे, सोमनाथ हारेर, महेंद्र तांबे, बंडू पाठक
शिवाजी सागर,हनुमंत घोरपडे, प्रभाकर हरिचंद्र, सुरेश चव्हाण, रवींद्र भापसे, विवेक मोरे, देविदास शिंदे, रावसाहेब लोहकरे, बाबाजी पालवे, अशोक दहातोंडे, किशोर पालवे यांच्यासह राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.