कोरोना महामारीच्या काळात नागरिक परदेशात गेले नाहीत.कोरोनाची लाट ओसरल्यानंतर विदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढली. गेल्या अकरा महिन्यांत सुमारे २६ हजार नागरिकांनी पासपोर्ट काढले असून, शिक्षणासाठी सर्वाधिक पासपोर्ट काढण्यात आले आहेत.

परदेशात शिक्षण घेण्याकडे कल वाढला आहे.वैद्यकीय व अभियांत्रिकी यांसारख्या पदवी घेण्यासाठी जिल्ह्यातील तरुण विदेशात जात आहे.विदेशात जाण्यासाठी आधी पासपोर्ट काढावा लागतो.

पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांकडून पडताळणी होऊन पात्र उमेदवारांना पोसपोर्ट देण्यात येतो. जिल्हा विशेष शाखेकडून गेल्या ११ महिन्यात पडताळणी करून २६ हजार नागरिकांना पासपोर्ट देण्यास हिरवा कंदील दाखविलेला आहे.

यामध्ये शिक्षण व पर्यटनासाठी पासपोर्ट मिळविणाऱ्यांची संख्या मोठी असून,पासपोर्ट घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.पर्यटनासाठी विदेशात जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

पासपोर्टही मिळणेही सोपे झाल्यामुळे पासपोर्ट घेण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत असून,पडताळणीत पात्र ठरलेल्यांना तात्काळ पासपोर्ट देण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील अनेक तरुण दरवर्षी शिक्षणासाठी विदेशात जात आहेत. विदेशात शिक्षण घेणाऱ्याऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच आर्थिक स्थिती सुधारल्याने पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

जिल्ह्यातून दरवर्षी अनेकजण पर्यटनासाठी विदेशात जात असून, पर्यटन क्षेत्रातील अनेक एजन्सींनी अहिल्यानगरमध्ये कार्यालये सुरू केली आहेत.काहीजण ऑनलाइन बुकिंगही करताना दिसतात.

शिक्षणाबरोबरच जिल्ह्यातील अनेकजण विदेशात नोकरी करत आहेत. विदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध होत असून, नोकरी व व्यवसायानिमित्त अनेकजण विदेशात वास्तव्यास आहेत.नोकरी व व्यवसायासाठी पासपोर्ट घेणाऱ्याऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

अनेकजण पर्यटनाचे नियोजन करतात. त्यांना भविष्यात विदेशात जायचे असते. त्यादृष्टीने काहीजण आत्ताच पासपोर्ट काढून घेत आहेत.एकदा पासपोर्ट मिळाला म्हणजे विदेशात जाण्याचे नियोजन करायला मोकळे, असे काहींचे म्हणणे आहे.त्यामुळे पासपोर्ट काढण्याकडे नागरिकांना कल वाढला आहे.

दरवर्षी २० ते २२ हजार नागरिक पासपोर्ट काढतात. कोरोना काळात पासपोर्ट काढणाऱ्याऱ्यांची संख्या अत्यल्प होती. त्यानंतर मात्र पासपोर्ट काढणाऱ्याऱ्यांची संख्या वाढली असून, दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे.

पोलिसांकडे पडताळणीसाठी दररोज शेकडोने अर्ज येत असतात.पोलिस विनाविलंब पडताळणी करून प्रस्ताव ऑनलाइन पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवितात.