नगर तालुक्यातील रांजणी हे डोंगर परिसराच्या कुशीत वसलेलं छोटसे गाव असून, मोबाईलचा टॉवर असूनही रेंज मिळत नव्हती.मात्र, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या मोबाईल रेंज प्रकरणाचा पुरेपूर पाठपुरावा करून दहा-पंधरा वर्षापासून रेंजच्या प्रतीक्षेत असलेले गाव रेंजमध्ये आणताच ग्रामस्थांचे मोबाईल खणखणू लागले आणि गावात एकच उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.
याबाबतची माहिती अशी की,नगर तालुक्यातील रांजणी हे गाव डोंगर परिसराच्या कुशीत वसलेलं छोटसं गाव असून,या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईलचा टॉवर उभारण्यात आलेला आहे; परंतु डोंगर पट्टयामुळे रेंज मिळत नसल्याने मोबाईल असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती येथील मोबाईल धारकांची झाली होती.
ग्रामस्थांनी सातत्याने मोबाईल कंपनीकडे पाठपुरावा केला, रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या.एखाद्या तरी कंपनीचा टॉवर आमच्या गावात उभा करावा आणि आमचे गाव रेंजमध्ये आणावे,अशी मागणी येथील ग्रामस्थांची होती.
शालेय विद्यार्थी,प्रशासकीय कर्मचारी यांची तर रेंज अभावी मोठी गैरसोय व्हायची.गावातील प्रमुख पदाधिकारी देखील मोबाईलची रेंज मिळावी,आमचे गाव मोबाईल टॉवरच्या माध्यमातून जगाच्या रेंजमध्ये यावे,यासाठी ग्रामस्थांची तळमळ असायची.
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र या मोबाईल रेंज प्रकरणाचा पुरेपूर पाठपुरावा करून दहा पंधरा वर्षांपासून रेंजच्या प्रतीक्षेत असलेले गाव रेंजमध्ये आणताच ग्रामस्थांचे मोबाईल खणखणू लागले आणि गावात एकच उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.
नगर दक्षिण मतदार संघामध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अनेक प्रलंबित विकास कामे आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून मार्गी लावली.वर्षानुवर्ष केवळ कागदावर आणि चर्चेत राहिलेला उड्डाणपुलासारखा विषय असो अथवा नगर – पाथर्डी रस्ता दुरुस्ती.
अशी अनेक कामे सुजय विखे पाटील यांनी पूर्ण करून आपल्या कामाची झलक मतदारसंघाला दाखवून दिली.रांजणी गाव देखील त्यांच्या कामाची साक्ष देणारे ठरले आहे.विखे पाटील या भागाचे खासदार नसले तरी त्यांनी पाठपुरावा करून मार्गी लावलेली अनेक विकास कामे अजूनही लोकांच्या नजरेत आणि चर्चेत आहेत.