मित्रांनो आपल्या भारतीय खाद्य शैलीत मसाल्यांना खूप जास्त महत्त्व आहे.आपले भारतीय जेवण मसाल्यांच्या विविधतेमुळे ओळखले जाते.तसेच भारतातील लोकांना चटकदार आणि मसालेदार खाण्याची आवड आहे.जेवणात तिखट पदार्थ खात नाहीत तोपर्यंत भारतीयांना जेवण केल्यासारखं वाट नाही.
तिखट आणि जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे तोंडाला चव येते पण त्यामुळे पोटात आग पडते आणि आतड्यांना सूज येऊ लागते.जास्त तिखट पदार्थ खाल्यामुळे पचनतंत्रावर जास्त दबाव पडून पचनसंस्था बिघडू लागते कारण तिखट पदार्थ पचायला जड असतात.
मसालेदार पदार्थांच्या अतिसेवनामुळे आतड्यांची आणि गुदद्वाराच्या भागाची हालचाल वाढून हळूहळू ताण निर्माण होऊन मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.
सध्याच्या काळात बऱ्याच लोकांना एकाच जागेवर बसून काम करावे लागते.एका जागेवर बसून काम केल्यामुळे शरीराला व्यायामाची कमतरता झाल्यामुळे शरीरातल्या रक्ताभिसरणावर परिणाम होतो.यामुळे गुदद्वाराच्या भागातील रक्तवाहिन्या कमजोर होऊन मूळव्याध होण्याची शक्यता वाढते.
मुळव्याधाचा त्रास किती भयंकर असतो हे त्यालाच माहिती असते ज्याला मूळव्याध झाला आहे.नीट चालता येत नाही,नीट बसता येत नाही,सायकल चालवण्याचा विचार तर लांबच राहिला.
मसालेदार पदार्थ खाल्ले कि पोटात युद्धाची घंटा वाजू लागते.मित्रांच्या मस्करीला तोंड देणे असो किंवा बायकोच्या ‘तिखट कमी कर’ या टोमण्यांचा सामना करने असो या सगळ्यांना त्या व्यक्तीला सामोरे जावे लागते.डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करत वैतागलेल्या लोकांना असं वाटू लागते कि,मूळव्याधापेक्षा उपवास करनेच बरे !
जर तुम्ही फळे, भाज्या, आणि फायबरयुक्त पदार्थ जेवणात खात नसाल तर तुमची पचनक्रिया नीट होणार नाही. जेवणात फायबरयुक्त पदार्थ खायला सुरुवात करा.भरपूर पाणी प्या,आणि मसालेदार पदार्थ मर्यादित खा.
तुम्ही सतत तणावात राहत असाल तर याचा तुमच्या पचनतंत्रावर वाईट परिणाम होतो,त्यामुळे पोट साफ न होणे,बद्धकोष्ठता होणे,आणि मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.मांसाहारी पदार्थ सुद्धा जास्त खाल्यामुळे मूळव्याध होऊ शकतो.
सिगारेट, तंबाखू, आणि दारूचे व्यसन यामुळे शरीरात विषारी घटक तयार होतात,त्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो.पेनकिलर्स किंवा अॅन्टीबायोटिक्सच्या जास्त वापरामुळे पचनसंस्थेच्या नैसर्गिक हालचाली बिघडतात.
त्यामुळे बद्धकोष्ठता वाढते आणि मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींना बाजूला ठेवा आणि आरोग्यपूर्ण सवयी आत्मसात करा.मसालेदार पदार्थांची आवड सोडली तर आरोग्याला नक्की फायदाच होईल.
फास्टफूड, मसालेदार पदार्थ, बैठ्या कामाची सवय आणि व्यायामाचा अभाव, यामुळे मूळव्याधीसारख्या त्रासाने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ही समस्या पूर्वीपेक्षा तरुण वयोगटात जास्त प्रमाणात दिसून येत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केल्याने मूळव्याध टाळता येऊ शकतो. रोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा आणि दीर्घकाळ बसणे टाळा. तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा अवलंब करा. मूळव्याध ही साधी वाटणारी समस्या दीर्घकालीन त्रासदायक ठरू शकते.
योग्य आहार आणि व्यायामाचे पालन केल्यास या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. कोणताही त्रास जाणवल्यास वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.