पावसाळा संपून आता हिवाळ्याला सुरुवात झाली असल्यामुळे आता वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.सध्या वातावरण असे आहे कि सकाळी थंडी वाजते,दुपारी उष्णता जाणवते आणि रात्री पुन्हा थंडी असं वातावरण दिसून येतंय.ग्रामीण भागात घरासमोर व शेतात शेकोट्या पेटू लागल्या आहे.

सायंकाळनंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे.लोक सायंकाळी बाहेर पडणे टाळत आहेत. लहान बालक व वृद्ध नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दिवसाही कमालीची थंडी जाणवत आहे. बदलत्या वातावरणामुळे उपजिल्हा रुग्णांलय व खासगी रुग्णांलयात उपचारासाठी दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे.

राज्यात सगळीकडे आजपासून थंडीचा जोर आणखी वाढणार,असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.त्यामुळे सर्वच ठिकाणी आता शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. थंडीचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

पुढील २४ तासांमध्ये धुक्याचं प्रमाण वाढणार असून, थंडीचा कडाकाही वाढणार आहे. येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्राच्या तापमानात मोठी घट झाली आहे.येथे किमान तापमानाचा आकडा १५ अंशांवर आला आहे.सकाळी आणि रात्री गारठा वाढला आहे, तर दुपारी उष्णता वाढल्याने उकड्यामुळे नागरिक हैराण होत आहेत.

सकाळी घराबाहेर पडणेदेखील येथे अवघड झाले आहे,मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर कमालीचा वाढला आहे. त्यामुळे शहरात शेकोट्यासमोर बसलेले नागरिक दिसून येत आहे.

यावर्षी राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस सुरु झाला होता. यावर्षी राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. आता पाऊस राज्यातून पूर्णपणे नाहीसा झाला आहे. त्यामुळे थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास सर्वच भागात तापमानात आता घट होताना दिसत आहे.

थंडीपासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी लोकरी कपड्याचा वापर करणे सुरू केले. दिवसभर थंडी जाणवत लागल्याने शहरातील रस्त्यांवर स्वेटर,जॅकिट आदी गरम कपडे परिधान केलेले नागरिक दिसून येत आहे. मॉर्निंग वॉकसाठी निघर्णाया नागरिकांची संख्याही या थंडीच्या कडाक्याने रोडावली आहे.

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या दाट धुक्याची चादर पसरली आहे. दिल्ली, बिहारमध्ये प्रचंड धुके पहाटे दिसून येत आहे. त्यातच राजधानी दिल्लीत आधीच प्रदूषण आणि त्यात दाट धुक्याची चादर पसरल्याने येथील हवेची गुणवत्ता खूप घसरली आहे.