तालुक्यातील मांडवे, गंगापूर (ता. राहुरी) येधील केटीवेअर बंधाऱ्यात लाखो मासे मृत्यूमुखी पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.वर्षभरातील ही दुसरी घटना असल्यामुळे बंधाऱ्याची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र अधोरेखित झाले आहे.
नागरीकांसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.प्रवरा नदी पात्रातील शेकडो मासे नेमके कशामुळे मेले,असा प्रश्न उपस्थित होत आहे.दुषित पाण्यामुळे मेलेल्या माशांची दुर्गंधी प्रवरा नदीकाठावर दोन्ही भागाकडे पसरली आहे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ पाणी अडवले गेले असल्यामुळे पाठीमागे मांडवे गंगापूर पुलापर्यंत पाणी तुंबले आहे.
त्यामुळे साचलेल्या पाण्याची प्रचंड दुर्गची पसरली आहे.या बंधाऱ्यातील पाण्यात मासे सडल्याचे दृश्य समोर आले आहे.तीन दिवसांपासून नदीपात्रात मृत्यूमुखी पडलेल्या माशांचा थर साचल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.
नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या गटारीच्या पाण्यामुळे परिसरात आणखी दुर्गंधी पसरून नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.दूषित पाण्यासह मृत माशांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोल्हार भागातून परिसरात वाढलेल्या ड्रेनेजचे पाणी, केमिकल्स युक्त घाणपाणी नदीपात्रात सोडले जात आहे.त्यांचा परिणाम जलचरांवर होत असल्याची चर्चा स्थानिक नागरीकांत सुरू आहे.सध्या नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याने जनावरेदेखील पाणी पित नसून शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
प्रवरा बाजारात मृत मासे विक्रीला आलेले असून व्यवसायिक मासेमारी करणाऱ्या लोकांनी काल गुरूवारी मिळेल तेवढे लहान-मोठे मासे टेम्पोमधून नेवून विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे ग्राहकांनी मासे खरेदीवेळी काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
नदीवरील गंगापूर-मांडवे येथे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडलेला आहे. नदी पात्रात दूषित पाणी सोडल्याने मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे.मागील दोन दिवसांपासून प्रवरा नदीपात्रात शेकडो मृत मासे तरंगताना दिसत आहे.त्यासाठी प्रदूषण महामंडळाने त्वरित लक्ष देण्याची मागणी नदी काठावरील नागरीकांनी केली आहे.
ड्रेनेजचे पाणी अन् केमिकल्स युक्त पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रातील पाण्यावर तेलकट तवंग दिसून येत आहे.बंधाऱ्यात पाणी काळभोर झालेले आहे.हे ड्रेनेजचे घाण पाणी अन् केमिकल्स मिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे सर्वच नदीपात्र दुषित झालेली आहे.
परिसरातील नागरीकांना उलट्या, मळमळीचा त्रास होत आहे. दुषित पाण्यामुळे मासे मृत पावल्याने मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे.त्यामुळे वास सुटलेला आहे.त्यामुळे हवेच्या परिणामामुळे उलट्या, मळमळीचा त्रास महिलांसह काही पुरुषांना सुरू आहे.