नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे,आता रेशन दुकानात तुमचे रेशन आले असेल,तर त्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे.एवढेच नाही तर रेशन उचलल्यानंतरही मेसेज मिळेल.

आपल्या हक्काचे रेशन दुसऱ्या कुण्या व्यक्तीने उचलल्यास त्याचाही मेसेज आपल्या मोबाइलवर येणार आहे.त्यासाठी शिधापत्रिकेशी आधार कार्ड जोडणी, मोबाइल क्रमांक जोडणी करणे आवश्यक आहे.सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वितरण केले जाते.

ई-पॉस मशीनद्वारे रेशन कार्ड धारकाच्या अंगठ्याचा ठसा घेऊन धान्य पुरविले जात असले,तरी तांत्रिक अडचणी आल्यास ओटीपीचा वापर करून धान्याची उचल करता येते; परंतु संबंधित लाभार्थ्यांचा मोबाइल क्रमांक शिधापत्रिकेशी संलग्न असणे आवश्यक आहे.

धान्याचे वितरण करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे धान्य दुकानदार संदर्भात ग्राहकांकडून अनेक तक्रारीसुद्धा प्राप्त होतात.त्यामुळे या प्रकारांना आळा बसावा आणि सुरळीत धान्य वितरण व्हावे,म्हणून पॉस मशीनद्वारे धान्याचे वितरण सुरु करण्यात आले आहे.

शिधापत्रिकेला मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी संबंधित गावातील स्वस्त धान्य दुकानदारांशी संपर्क साधावा,तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधून मोबाइल क्रमांक जोडणीसाठी अर्ज करावा.आधार कार्ड जोडणी,मोबाइल क्रमांक जोडणी या प्रक्रियेमुळे रेशन उचलल्यानंतर मोबाइलवर संदेश येतो.

एखाद्या कार्डधारकाने स्वस्त धान्याचा लाभ घेण्याकरिता मोबाइल ओटीपी सेवेचा लाभ घेतल्यास त्याच्या मोबाइलवर धान्याची उचल केल्याचा संदेश येतो.त्यामुळे त्याला धान्याच्या उचल बद्दल सर्व माहिती प्राप्त होते.त्यामुळे आधार कार्ड तसेच मोबाइल नंबर लिंक करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात अंत्योदय योजना, प्राधान्यक्रम तसेच पांढरे रेशन कार्डधारक असे ७ लाखांवर कार्डधारक असून ९० टक्क्यांहून अधिक लाभार्थ्यांचे मोबाइल अपडेट झाले आहेत.प्रत्येक कार्डधारकांनी आपला मोबाइल लिंक करावा यासाठी पुरवठा विभाग तसेच रेशन दुकानदारांकडून जनजागृती केली जात आहे.

आपला मोबाइल क्रमांक अपडेट करायला पैसे लागत नाहीत त्यामुळे आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन आपला मोबाइल क्रमांक अपडेट करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.