एसटीचा प्रवास सुखकर व सुरक्षित मानला जातो.बसमधील सर्व प्रवाशांचा जीव चालकावर अवलंबून असतो.त्यामुळे बसचालक हा पूर्ण प्रशिक्षित असणे आवश्यक आहे याची खबरदारी एसटी महामंडळाकडून घेतली जाते.

महामंडळात नियुक्ती होण्यापूर्वी खासगी बस चालविल्याचा त्याच्याकडे अनुभव असणे आवश्यक असते.महामंडळात चालक म्हणून निवड झाल्यानंतर त्याला ४८ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.त्यानंतर विभागीय वाहतूक अधिकारी व अभियंता यांच्या उपस्थितीत निवड चाचणी घेतली आहे.

चालक पदासाठी हि पात्रता असणे गरजेचे आहे – चालक पदासाठी दहावी उत्तीर्ण, अवजड वाहन चालविण्याचा परवाना, तीन वर्षांचा अवजड वाहन चालविण्याचा अनुभव, मोटार मालकाचे अनुभव प्रमाणपत्र, महामंडळाचे ८० दिवसांचे प्रशिक्षण.

अपघात प्रवण पाठ्यक्रम प्रशिक्षणात या गोष्टी असतात – घाटमाथा, सपाटीकरण व रात्रीच्या वेळी बस चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.तसेच अपघात प्रवण क्षेत्रात कशी दक्षता घ्यावी,याचेही प्रशिक्षण दिले जाते.

घाटात वाहन चालवून दाखवावे लागते – चालकांना घाटात बस चालविण्याचे प्रथम प्रशिक्षण दिले जाते.घाटात बस चालविताना मार्गदर्शन करण्यासाठी दोन वरिष्ठ देखील सोबत असतात, शहरात, रात्रीच्या वेळी आणि घाटात वाहन चालवून दाखवावे लागते.

य ठिकाणी मिळते प्रशिक्षण – एसटी चालकांना पूर्वी ४० दिवसांचे प्रशिक्षण दिले जायचे,तर आता ८० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.घाट,राष्ट्रीय महामार्गावर गाडी चालवण्याचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते.

१ आठवडा प्रशिक्षणाची उजळणी – राज्य परिवहन महामंडळाकडून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला पुन्हा ४८ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.यासाठी विभागस्तरावर प्रशिक्षणासाठी स्वतंत्र वाहने असतात.

एसटीचे धोरण; सुरक्षेबाबत तडजोड नको -प्रवाशांच्या सुरक्षेबाबत एसटी महामंडळ अतिशय संवेदनशील असते. सुरक्षिततेबाबत तडजोड केली जात नाही.दरवर्षी कर्तव्यावर पाठवताना चालकांची मनस्थिती सु‌द्धा लक्षात घेतली जाते.

एसटी महामंडळाकडून आम्हाला प्रशिक्षण मिळाले.राष्ट्रीय महामार्ग, घाट वळण, रातराणी अशा प्रकारच्या सर्व मार्गावर प्रशिक्षण व नियमांची माहिती घेऊन आम्ही सेवेत रुजू झालो असे कोपरगाव आगाराचे चालक भाऊसाहेब वीरकर यांनी त्यांचा अनुभव सांगितला.