नोव्हेंबर महिना संपत आला असून आता डिसेम्बर महिन्याचे आगमन होत असताना वातावरणात देखील बदल घडू लागला आहे.वातावरणात गारव्याचे प्रमाण हळू हळू वाढत असल्याचे जाणवत आहे.

या वातावरणातील बदलामुळे सर्दी पडसे या आजाराची साथ वाढायला लागली असून लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेच आजारी पडत आहेत.त्यामुळे या सिझन मध्ये प्रत्येकाने काही काळजी घेतली पाहिजे.

नाही म्हणलं तरी आता थंडी सुरू झाल्यामुळे अनेक आजारांचा धोकादेखील वाढतो. हिवाळ्यात आहारात तसा बदल करणे देखील महत्त्वाचे आहे नाहीतर अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

हिवाळ्यात थंड वातावरण असल्यामुळे जास्त तहान लागत नाही.त्यामुळं लोकं कमी पाणी पितात; पण कमी पाणी पिल्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. तुम्ही जर कमी पाणी पित असाल तर त्याचे तूमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येऊ लागतात.

तुम्ही हिवाळ्यात जर कमी पाणी पित असाल तर तुमचे शरीर निर्जलित होईल.त्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.तुम्ही जर कमी पाणी पित असाल तर तुम्हाला युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

हिवाळ्यात पाणी कमी पिल्यामुळे मूत्राशय आणि त्याच्या नळीला बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.याचा महिलांना अधिक धोका असतो.

तुम्ही पाणी कमी पिले तर तोंडाची दुर्गंधी येऊ शकते.कमी पाणी प्यायल्याने आपले शरीर निर्जलीकरण होते, ज्याचा आपल्या शरीराच्या अनेक अवयवांवर वाईट परिणाम होतो.

कमी पाणी पिल्यामुळे पोटाशी संबंधित आजार उद्भवतात.पचनक्रिया कमकुवत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.पाणी कमी पित असाल तर लघवी पिवळी होते. शिवाय दुर्गंधी देखील येते.

वरती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही लक्षण दिसत असतील तर तर समजा कि तुम्ही कमी पाणी पित आहात.कमी पाणी पिल्यामुळे त्वचा कोरडी पडायला लागते.याशिवाय इतर त्वचेचे आजार देखील होऊ शकतात.

शरीरात पाणी कमी पडल्यामुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्या वाढू शकते. शरीरात पाण्याची कमतरता आली तर त्याचा सर्वात आधी ताण हा किडनीवरच पडतो जे कि चांगले लक्षण नाही.

हिवाळ्यात स्वतःला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी ७-८ ग्लास पाणी प्यायाला पाहिजे.दर तासाला मध्ये-मध्ये पाणी प्यायला पाहिजे. दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटू लागते.

हिवाळा सुरू झाल्यावर आपण आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांची सुद्धा काळजी घेतो; मात्र अनेक जण या थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायला सुरुवात करतात;पण कमी पाणी पिल्यामुळे आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात.

कमी पाणी पिल्यामुळे त्वचा रुक्ष होणे, कोरडी होणे या समस्या निर्माण होतात. यासोबतच कमी पाणी पिल्यामुळे किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते. आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर शरीर हळूहळू कमजोर होऊ लागते.

पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचे असते, जर शरीरात पाणी कमी पडले,तर याचा शरीराच्या संपूर्ण कार्यावर परिणाम होतो.पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा जाणवू लागतो.

यामागील महत्वाचे कारण म्हणजे रक्ताला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.तुम्हाला शरीरात जास्त थकवा जाणवत असेल तर पाणी जास्त प्यायला सुरुवात करा.

हिवाळ्यात पाणी पिणे महत्वाचे असल्यामुळे दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे असले तरी हिवाळ्यात अती पाणी पिणेही शरीरासाठी चांगले नाही.कारण हिवाळ्यात जास्त थंड पाणी पिल्यास जठराग्री मंद होतो.त्यामुळे अपचन व बद्धकोष्टतेसारख्या समस्या निर्माण होतात.