निवडणूक कोणतीही असली तरी दारूचा खप हा वाढतोच.स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका म्हटले की, दारू मग ती देशी असो की विदेशी नाही तर बिअर त्याचा खप चांगलाच वाढतो.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सप्टेंबर महिन्यापेक्षा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात दारुला मागणी वाढल्याचे दिसून आले.

१५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली. ते २३ नोव्हेंबर मतमोजणीपर्यंत अशा दोन महिन्यात देशीदारू २६ लाख ८१ हजार ९४६ लिटर, विदेशी दारू २० लाख ८१ हजार ४३३ लिटर तर बिअर १९ लाख २२ हजार ८४९ लिटर दारू जिल्ह्यात रिचवली गेली. या निवडणुकीत विदेशी व बिअरचा मोठ्या प्रमाणावर खप झाला आहे.

१५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली.तेव्हापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने करडी नजर अनाधिकृत दारू विक्रीवर ठेवली होती.या निवडणूक काळात या विभागाने अनेक कारवाया करून मोठा मुद्देमाल जप्त केला.

पण परवानाधारकांकडून अधिकृतपणे दारूची या काळात मोठी विक्री झाली.निवडणुकीपूर्वी सप्टेंबर महिन्यात देशी दारूचा खप हा ११ लाख ६७ हजार ९७८ लिटर होता. तो खप ऑक्टोबर महिन्यात थेट दोन ते अडीच लाखांनी वाढला आहे.

या ऑक्टोबर महिन्यात १३ लाख ४१ हजार ८१० तर नोव्हेंबर महिन्यात देखील १३ लाख ४० हजार १३६ लिटर देशीदारू विकली गेली आहे.विदेशी दारूचा खप देखील नोव्हेंबर महिन्यात वाढला आहे.सप्टेंबर महिन्यात ९ लाख ९१ हजार १०४ लिटर विदेशी दारूची विक्री झाली आहे.

ती ऑक्टोबर महिन्यात ९ लाख ८१ हजार १६६ होती तर नोव्हेंबर महिन्यात ११ लाख २६७ लिटर विदेशी दारू रिचवली आहे.बिअर देखील नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर खपली आहे.या नोव्हेंबर महिन्यात १३ लाख ५३ हजार ५४ लिटर बिअरची विक्री झाली.

ऑक्टोबर महिन्यात निम्माने म्हणजे ५ लाख ६९ हजार ७९५ लिटर तर सप्टेंबर महिन्यात ५ लाख ४१ हजार ६२१ लिटर बिअर खपली आहे.वाईनच्या खपात घट झाली आहे.सप्टेंबर महिन्यात २१ हजार ५२४ लिटर, ऑक्टोबरमध्ये १४ हजार २८९ तर नोव्हेंबर महिन्यात १३ लाख ३४२ लिटर वाईनची विक्री झाली आहे.

या निवडणूक काळात वाईनची मागणी कमी झाल्याचे दिसून आले.विधानसभा निवडणूक काळात ऑक्टोबरमध्ये देशीदारूचा खप १३ लाख ४१ हजार ८१० लिटर होता.तर नोव्हेंबरमध्ये तो १३ लाख ४० हजार १३६ लिटर झाला. देशीदारूच्या विक्रीत १६७४ ने घट झाली.

तर विदेशी दारूच्या विक्रीमध्ये ५६ हजार १६ लिटरने वाढ झाली. ऐन थंडीचे दिवस असूनही निवडणूक काळात बिअरच्या खपामध्ये ७ लाख ८३ हजार २५९ लिटरने वाढ झाली.गेल्या वर्षीच्या तुलनेत देशी दारूच्या खपात घट झाली आहे.तर विदेशी दारूच्या कपात दुपटीने वाढ झाली आहे.

बियरमध्येही ३ टक्क्यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झालेली आहे.जिल्ह्यात मद्य उत्पादन करणारे ९ कारखाने आहेत. १२६३ परवानाधारक मद्यविक्रेते आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाने नगर जिल्ह्याला यंदा २८७९ कोटी रुपयांचे महसूल संकलनाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे.

त्यापैकी एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या आठ महिन्यात निम्माच, म्हणजे १५११ कोटी रुपयांचा महसूल संकलित झाला आहे. मद्यविक्रीत झालेल्या घटीमुळे महसुलात घट आली आहे.गेल्या वर्षी २७२६ कोटी रुपयांच्या महसूल संकलनाचे उद्दिष्ट होते.निवडणूक काळात दारुचा सर्वाधिक खप झाला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात सुमारे अडीच कोटी रुपयांची अवैध दारू पकडले.दारू वाहतूक करणारी ५८ वाहनेही जप्त केली.तसेच दोन विक्रीचे दोन परवाने रद्द केले तर आणखी दोन परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव आहे.

याशिवाय उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमधून ओव्हटाईम बंद करण्यात आला होता.वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवण्यात आली होती. उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये सीसीटीव्ही बसवून त्याचा नियंत्रण कक्ष उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात तयार करण्यात आला होता.

निवडणुकांच्या आचारसंहिता काळात मद्य विक्री करतील असा संशय असलेले जिल्ह्यातील सुमारे १२० परवानाधारकांचा साठा ‘ड्रायडे’ काळात सील करण्यात आला होता.राहुरीमध्ये ४७ लाख रुपये किमतीची बियर जप्त करण्यात