हिवाळ्यात अनेकजण पौष्टिक आहाराचे सेवन करतात त्यात काजू, बदामला प्राधान्य देतात.परंतु हिवाळ्यात ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग ऊब तयार व्हावी, यासाठी उडीद, बाजरी, ज्वारी या धान्याला पसंती देतात.शेतकरी वर्गाला हिवाळ्यात चुलीवरची खरपूस बाजरीची भाकर ऊब देणारी ठरते.

सध्या फक्त ग्रामीण भागातच चूल पाहायला मिळते.शहरी भागात मातीच्या चुलीची जागा गॅसने घेतल्यामुळे शहरातील महिला चुलीवरची भाकरी बनवने आणि खाणे पसंत करीत नाहीत.

खेड्यात बाजरीच्या भाकरीला हिवाळ्यात लोक पसंती देतात तसेच त्यांच्या रोजच्या खाण्यात बाजरीच्या भाकरीचा समावेश असतो.बाजरीची भाकर खाण्याचे फायदे समजल्यामुळे आता शहरी भागातील लोक ग्रामीण भागातील चुलीवरच्या गरम गरम बाजरीच्या भाकरीला पसंती देऊ लागले आहे.

बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि इतर पौष्टिक घटक असतात. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.मॅग्नेशियम मुळे रक्तदाब कमी करण्यासाठी मदत होते.त्यामुळे हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

बाजरीची भाकर खाल्यानंतर लगेच पोट भरते कारण यात फायबर्सचे प्रमाण असते आणि त्यामुळे अति जेवण करणे टाळतो आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते.जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करा.हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात,असे आहार तज्ज सांगतात.

अनेकांचे बाजरीची भाकरी आणि ठेचा आवडते खाद्य पदार्थ आहे.भाकरी फक्त चवीसाठी नाही तर चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.सध्या थंडीचे प्रमाण वाढत असून ग्रामीण भागासह आता शहरातदेखील बाजरीची भाकरी खाण्यास पसंती मिळत आहे.भाकरी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.आहार तज्ञजांच्या मते बाजरीची भाकरी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते.ज्यामुळे शरीराबरोबरच हृदयाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. ज्वारीसह बाजरी डायबिटीसच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरते.बाजरीतील पोषक तत्व डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.

आठवड्यातून २ ते ३ दिवस बाजरीची भाकरी खाल्ल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.पचन क्रिया चांगली राहण्यासाठी बाजरी फायदेशीर ठरते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि पचनाचे विकार दूर होण्यास मदत होते ग्रामीण भागात पिठलं आणि बाजारीची भाकरी, ठेचा आणि कांदा सर्वाधिक आवडीने खाल्ले जाते.

पुर्वी ज्वारीची भाकरी, बाजरीला ग्रामीण भागात सर्वाधिक पसंती मिळत. परंतु आता शहरी भागात देखील उन्हाळ्यात ज्वारीची तर हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्यास प्राधान्य दिले जात आहे.थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असून बाजरी ही शक्तीवर्धक मानली जाते.

त्यामुळे दिवसभर उर्जा टिकवून ठेवण्यासाठी ती उपयुक्त ठरते. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन्स, कॅलरीज, व्हिटॅमिन बी ६, कॅल्शियम, लोह हे खूप जास्त प्रमाणात असते. त्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.