गेल्या वर्षी तालुक्यात पाऊस कमी झाला होता.त्यामुळे रब्बीची सरासरी ८५ टक्के पेरणी झाली होती.यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सरासरी १०५ टक्क्यांपर्यंत पेरणी होईल,अशी शक्यता आहे.कांद्याचे क्षेत्र वाढणार असून,आतापर्यंत ९१ टक्के पेरणी झाली आहे.
पाणी मुबालक असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के पेरणी वाढेल,असा अंदाज तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे यांनी व्यक्त आहे.रब्बी हंगामाला पोषक वातावरण सध्या निर्माण झाले आहे.त्याचाच परिणाम म्हणून ९१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
उर्वरित शेतकऱ्यांची मशागत करण्यासाठी धावपळ सुरू आहे.तालुक्यात प्रामुख्याने ज्वारी, गहू, मका, हरबरा, कांदा, ऊस,तूर व अन्य चारा पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.समाधानकारक पावसाने मुळा धरण काठोकाठ भरले आहे.
जायकवाडीला मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेल्याने शेती आवर्तने मिळणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकाचे नियोजन केले आहे.प्रामुख्याने कांदा, ऊस व मका पिकावर भर दिसून येत आहे.
तालुक्यात १०५ टक्के पेरणी आहेत तर उर्वरित पेरण्या ३१ डिसेंबर होईल,त्यापैकी आत्तापर्यंत जवळपास पर्यत पूर्ण होणे अपेक्षित ९१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे.ज्या शेतकऱ्यांना कांदा लावण्याचा आहे अशा शेतकऱ्यांनी शेतामध्ये बी टाकले होते.परंतु, अतिरिक्त पाऊस कोसळल्याने बियाणाची उतरण झाली नाही.
त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या सह्याने कांदा बी पेरून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यावर भर देत आहे.मागील वर्षी कांद्याला समाधानकारक भाव मिळाला,तो अद्यापही टिकून आहे.शासनाने कांदा निर्यातीचे धोरण हाती घेतले आहे. त्यामुळे यावर्षीही भाव कायम राहतील अशी शक्यता आहे.या भावनेतून कांदा लागवड करत आहे.
यंत्राच्या साह्याने कांद्याची पेरणी केल्याने वेळेची व पैशाची बचत होते.सम प्रमाणात बीयाणे पडते.त्यामुळे कांदा पोसण्यास मदत होते.कांदा लागवडीसाठी १ किलो जास्त बी लागते.त्याप्रमात यात्राला १ किलो कमी बियाणे लागते.रोपवरील औषध फवारणी व खतांच्या खर्चात बचत होते.तसेच, मजूर मिळत नसल्याने पेरणी यंत्राचा तालुक्यात अलीकडील काळामध्ये वापर वाढला आहे.
शेतकऱ्यांनी कृषी सेवा दुकानदारांकडून बियाणे किंवा अन्य वस्तू खरेदी करताना पक्के बिल घ्यावे.कृषी सेवा चालकांकडून आपली फसवणूक होत असेल,तर त्वरित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले आहे.