जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वनक्षेत्र स्थिती चांगली आहे.अकोले, संगमनेर, राहुरीसह इतर तालुक्यांत बिबट्यासह इतर हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.ज्या भागात प्राण्यांचा वावर आढळला त्या भागातील शेतकरी, कामगारांनी दक्षता घेण्याची गरज आहे.
बिबट्यासह इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्याचा मृत्यू झाला, तर २५ लाख रुपये मदत देण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. शिवाय जखमींवरील उपचारासाठीही शासनाकडून मदत दिली जाते.
जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या फक्त दोन टक्क्यांच्या आत वनक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यातील चार जिल्ह्यांचा समावेश असून, यात नगर (१.५८ टक्के) जिल्हा चौथ्या स्थानावर आहे.
हिंस्त्र प्राण्यांना बंदिस्त करून वनक्षेत्रात सोडण्याची कामगिरीही यापूर्वी वन विभागाच्या पथकांकडून करण्यात आली आहे. बिबट्यासह इतर वनक्षेत्रातील हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्याचा मृत्यू झाला, तर यापूर्वी शासनाकडून २० लाख रुपयांची मदत दिली जात होती. ती मदत आता २५ लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
शासनाकडून वारसांना १० लाखांचा धनादेश दिला जातो.उर्वरित रकमेची १० वर्षासाठी एफडी केली जाते. शिवाय हल्ल्यात एखादी व्यक्ती जखमी झाली, तर त्याच्यावरील उपचारासाठी काही प्रमाणात शासकीय निधी दिला जातो.त्यासाठी तुम्हाला वन विभागाशी संपर्क करणे गरजेचे आहे.
बिबट्या किंवा इतर हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात एखादी व्यक्त्ती जखमी झाली, तर तिच्या औषधोपचारासाठी मर्यादित स्वरूपात रक्कम शासनाकडून दिली जाते.
वन्यप्राण्यांकडून होणारा प्राणघातक हल्ला असो किवा पिकांचे होणारे नुकसान असो,त्याची माहिती तत्काळ वन विभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी.
वन्य प्राण्यांकडून पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते.झालेल्या नुकसानीचे पथकाकडून पंचनामे केले जातात आणि या नुकसानीपोटी शासनाकडून मदत दिली जाते.