नगर बाजार समितीमध्ये शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येतात; परंतू पडताळ बसत नसल्याने शेतकरी वाहनात पाच दहा गोण्या वाढीव भरतात ; परंतु ओव्हरलोडच्या नावाखाली परिवहन विभागाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दंड आकारला जातो,हे योग्य नाही.

परिवहन विभागाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाहक त्रास दिल्यास खपवून घेणार नाही,असा शब्दांत आमदार शिवाजी कर्डिले यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना समज दिली आहे.कांद्याच्या भावात थोडाफार चढउतार होत असला तरी सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात मार्केटला कांदा विक्रीसाठी आणत आहेत.

चार-पाच शेतकरी एकत्र येऊन चारचाकी वाहनाने कांदा गोण्यांमध्ये भरून मार्केटला विक्रीसाठी आणतात.नियमापेक्षा चार-पाच गोण्या गाडीत वाढीव असतात.यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी,वाहन चालक व शेतकऱ्याला मोठा दंड करतात, त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांबाबत तरी प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी व होणारा दंड टाळावा,अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी आमदार कर्डिले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे व्यक्त केली आहे.अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून आ. कर्डिले यांना बेस्ट चेअरमन पुरस्कार मिळाला.

जिल्हा बँकेबरोबरच बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे हे फळ आहे.आशिया खंडातली शेतकरी हिताची जिल्हा सहकारी बँक असून, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून या बँकेची वाटचाल सुरू आहे.बेस्ट चेअरमन हा पुरस्कार जीवनातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार असल्याचे आ. कर्डिले म्हणाले.

या पुरस्काराबद्दल आमदार कर्डिले यांचा करंजी ग्रामस्थांच्या वतीने शिक्षक नेते विजय अकोलकर, माजी सरपंच सुनील साखरे, संचालक सुभाष अकोलकर, युवानेते आबासाहेब अकोलकर, माजी सरपंच शिवाजी भाकरे

माजी चेअरमन आसाराम अकोलकर, उत्तम अकोलकर, राजेंद्र अकोलकर, बबन अकोलकर, ग्रा. पं. सदस्य राहुल अकोलकर, नवनाथ आरोळे, विवेक मोरे, नितीन खांदवे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.