शेतकऱ्यांसाठी रिझर्व बँकेने मोठा निर्णय घेत काहीही गहाण न ठेवता दोन लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली आहे.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अकराव्या वेळेसही रेपो दर कमी केला नाही,परंतु यावेळी शेतकऱ्यांना मोठा गिफ्ट दिले आहे.आर्थिक मदत देण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी कोलॅटरल फ्री कर्जाची मर्यादा ४० हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांना आता बिनधास्त कर्ज घेता येईल.आरबीआयने शेतकऱ्यांसाठी को-लॅटरल फ्री कर्जाची मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.यापूर्वी ही मर्यादा १.६० लाख होती.आता शेतकऱ्यांना काहीही गहाण न ठेवता बिनधास्त २ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल.हा निर्णय महागाई आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतला गेला आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य भांडवल मिळवण्यासाठी कधी कधी काही ठिकाणी गहाण ठेवण्यासाठी कागदपत्रे न दाखवता कर्ज मिळवणे आवश्यक होते. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे बँकेत गहाण ठेवण्यासाठी काहीही नसते,त्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही.म्हणूनच आरबीआयने शेतकऱ्यांसाठी को-लॅटरल कर्ज योजना सुरू केली आहे.
शेतकऱ्यांना पिके लागवडीसाठी आणि बी बियाणे विकत घेण्यासाठी कर्ज मिळेल,शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळेल, म्हणजेच भाज्या किंवा फळे पिकवण्यासाठी,शेतीसाठी जमीन विकत घेण्यासाठी देखील कर्ज मिळेल, दूध, अंडी, मांस किंवा उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी पशुपालनासाठी कर्ज मिळेल, शेतकऱ्यांना त्याच्या पिकांची साठवणूक करण्यासाठी गोदाम बांधण्यासाठी कर्ज मिळेल,सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी देखील कर्ज मिळेल.
आरबीआयकडून व्याज दरात सूट देण्यात येत आहे.आरबीआय शेतकऱ्यांना को लॅटरल फ्री कर्ज देत असतानाच, त्यांना व्याज दरातही सूट दिली आहे.साधारणतः या प्रकारच्या कर्जावर ७ टक्के व्याज आहे, पण शेतकऱ्यांनी वेळेपूर्वी कर्ज फेडल्यास, बँक शेतकऱ्यांना ३ टक्के सबसिडी देईल.यामुळे शेतकऱ्यांना प्रभावी व्याज दर ४ टक्के असेल.त्यामुळे, शेतकऱ्यांना को लॅटरल फ्री कर्जाचा दुप्पट फायदा होईल.