Home अहिल्यानगर Ahilyanagar News : संगमनेर नगरपरिषद हद्दीत फेकला जातोय कचरा : मुख्याधिकाऱ्यांनी दिले...

Ahilyanagar News : संगमनेर नगरपरिषद हद्दीत फेकला जातोय कचरा : मुख्याधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश

संगमनेर शहरात असलेल्या काही ग्रामपंचायतींमध्ये कचऱ्याची समस्या बिकट बनत चालली आहे.कासारा दुमाला ग्रामपंचायतीच्या हद्दीत घंटागाडी नियमित येते.

मेडिकव्हर हॉस्पिटल पासून पुढे गेल्यानंतर गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकी कचरा उघड्यावर फेकत असल्याचे दिसत आहे.कासारा दुमाला ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थ येथे कचरा आणून टाकतात.

संगमनेर नगरपरिषद तसेच शहरालगत असलेल्या काही ग्रामपंचायतींच्या हद्दीत बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.बरेच नागरिक उघड्यावरच कचरा टाकतात.

स्वच्छतेच्या बाबतीत अनेक पुरस्कार घेणाऱ्या संगमनेर नगर परिषदेच्या हद्दीत सुद्धा कचरा उघड्यावर फेकला जातो,यावर गंभीर कारवाई करण्याची गरज आहे.जाणीवपूर्वक कचरा उघड्यावर फेकणाऱ्यांवर कारवाई व्हावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

‘कचरा घंटागाडीतच टाका’ असे आवाहन करणारा फलक गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात आला.नागरिकांनी साचलेला कचरा जाळला होता त्यामुळे,त्यामुळे प्रदूषणाची समस्या सुद्धा निर्माण होत आहे.

उघड्यावर कचरा टाकणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्यावरही दंडात्मक,फौजदारी स्वरूपाच्या कारवाईला सुरुवात करणार आहे. कुणीही कचरा उघड्यावर फेकू नये.

नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे असे आदेश रामदास कोकरे (मुख्याधिकारी, संगमनेर नगर परिषद) यांनी दिले आहे.

गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन-तीन दिवस सलग संगमनेर तहसील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात होता.

याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कार्यवाही केली.नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कचरा फेकलेल्या नागरिकांचा शोध घेतला.संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर तेथे पुन्हा कचरा दिसून आला नाही.

मात्र, इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो आहे.मालपाणी हेल्थ क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर नगर परिषदेच्या हद्दीत दोन-तीन ठिकाणी उघड्यावरच कचरा फेकला जातो.

कचरा संकलन योग्य पद्धतीने होत नसल्याने हा कचरा फेकला जातोय का? हा कचरा नेमका कुठला आहे? याचा शोध घेऊन संबंधितांवर नगर परिषदेने कारवाई करावी, अशीही नागरिकांनी मागणी केली आहे.