सरकारने एसटी महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणाऱ्या लेडीज,वयोवृद्ध,विद्यार्थी,खेळाडू या प्रवाश्याना तिकीट दरात भरपूर सवलती दिल्या आहेत,जेणे करून एसटीच्या प्रवाश्यांमध्ये वाढ होऊन एसटीचे उत्पन्न वाढावे.
महिलांना बसमध्ये प्रवासासाठी ५० टक्के सवलत, ७५ वर्षांपुढील प्रवाशांना बसमध्ये मोफत प्रवास,अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना सरकारने राबवल्या,त्यामुळे एसटी बसमध्ये प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली.
सरकारने प्रवाशांना एसटी बसमध्ये सवलती दिल्या असल्या तरी एसटीच्या देखभाल दुरुस्तीकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.एसटीच्या देखभालीचा प्रश्न उभा राहतो तेव्हा सरकारकडून एसटी तोट्यात असल्याचे सांगितले जाते.
या बसेस बऱ्याच वेळा रस्त्यातच बंद पडतात आणि प्रसवाश्याना त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि यांचा वेळहि वाया जातो. बस मध्ये बिघाड होऊन बस रस्त्याच्या कडेला बंद पडण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत.
बस रस्त्यात बंद पडल्यामुळे लोक दुसऱ्या बसची वाट बघत ताटकळत उभे राहतात आणि दुसरी बस आल्यावर त्या बसमधील वाहक गाडीत गर्दी असल्याचे सांगतो आणि प्रवाश्याना आत घेत नाही आणि ड्राइव्हर सुद्धा कधी कधी गाडी न थांबवता सरळ वेगाने पुढे निघून जातात.त्यामुळे उत्पन्न मिळत नाही आणि एसटीच्या तोट्यात आणखी भर पडते.
हात दाखवा, गाडी थांबवा, हे ब्रीद वाक्य आता चालक आणि वाहक आता विसरूनच गेले आहेत की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
अनेक वेळा प्रवाशांनी खचाखच भरलेली बस अचानक तांत्रिक बिघाड होऊन रस्त्यावरच उभी राहते, त्यामुळे प्रवाशांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो.
सरकारने प्रवाशांना सवलती नक्कीच द्याव्या; परंतु एसटी बसच्या देखभाल दुरुस्तीकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.नगर पाथर्डी रस्त्यावर एसटी बस दिवसा व अपरात्री बंद पडतात.
पाथर्डी, शेवगाव डेपोच्या बसेसचा यामध्ये मोठा समावेश आहे.एसटी बस बंद पडल्यानंतर प्रवाशांची मोठी गैरसोय होते आणि संतापही व्यक्त केला जातो.