टाकळीभान येथील आरोग्य केंद्राला मिळालेली रुग्णवाहीका सध्या चालकाविना धुळखात पडुन आहे.सप्टेबर महिन्यात चालकाचा करार संपला असला तरी तातडीच्या सेवेसाठी जुन्या नेमणुकिवरील चालक सेवा देत असतानाही तालुका आरोग्य आधिकारी यांनी त्या चालका कडुन रुग्णवाहीकेची चावी काढुन घेतल्याने रुग्णांची ससेहोलपट सुरु झाल्याने त्वरीत रुग्णवाहीके वरील चालकांच्या नेमणुका व्हाव्यात अशी मागणी होत आहे.
टाकळीभान आरोग्य केंद्र सध्या तक्रारींचे केंद्र झाले आहे.नुकतीच रात्रीच्या ९ वाजताचे वेळी व पहाटे ३ वाजता ऊस तोडणी आदिवासी महिला आठ महिन्याचे असतानाच उसाच्या तांड्यावर प्रस्तुत झाली,परंतु त्या प्रस्तुतीत गर्भपिशी बाहेर आली होती.
आरोग्य केंद्र आलेल्या आदीवासी महीलांना आरोग्य अधिकारी हजर नसल्याने उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात पाठवण्यासाठी आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका चालका अभावी उपलब्ध न झाल्याने त्या महीलेला खाजगी वहानातुन पुढील उपचारासाठी लोणी येथे पाठवण्यात आले होते.
त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महीलेची चांगलीच हेळसांड झाल्याने आरोग्य केंद्राच्या कामकाजावर चांगलीच राळ उठली होती.रुग्णवाहीकेबाबत अधिक माहीती घेता असे समजले कि, रुग्णवाहीका चालक अनिल दाभाडे हा ठेकेदारी पृध्दतीवर चालकाचे काम करीत आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये ठेकेदारीवरील या चालकाचा करार संपलेला आहे.माञ सेवा म्हणुन हा चालक रुग्णसेवा देण्याच्या हेतुने बिनपगारी रुग्णसेवा देत होता.माञ विधानसभा निवडणुकि नंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी या चालकाकडुन रुग्णवाहीकेची चावी काढुन घेतल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे चालकाविना रुग्णवाहीका धुळूखात पडुन आसल्याने तातडीच्या रुग्णांची हेळसांड होत आसल्याने आरोग्य विभागा बाबत ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहीकेवर गेल्या अनेक वर्षांपासुन कंत्राटी चालक म्हणुन मी कार्यरत होतो.
गेल्या सप्टेबर महीण्यात माझा कंत्राटी चालकाचा करार संपलेला आहे.त्यानंतरही मी रुग्णसेवेसाठी रुग्णवाहीकेद्वारे बिनपगारी रुग्णसेवा देत होतो.
असे आसतानाही तालुका आरोग्य अधिकारी यांनी २२ नोहेंबर २०२४ रोजी विना परवानगी कार्यालयात गैरहजर असल्याबाबत मेमो देवुन नोहेंबर व डीसेंबर महीण्याचा पगार परवानगी शिवाय देण्यात येवु नये असे मेमोत नमुद केले आहे.
त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी माझ्याकडुन रुग्णवाहीकेची चावी काढुन घेतल्याने त्या रात्री मी रुग्णसेवा देवु शकलो नाही असे रुग्णवाहीका चालक अनिल दाभाडे यांनी सांगितले.