निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच निळवंडे कॅनॉलचे अस्तरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्यावर पाणी मारले जावे,अशा विविध मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी काल कालव्यात उतरून प्रशासनाचा निषेध करत काम बंद पाडले.
यावेळी रस्त्यावर कालव्याच्या माल वाहतुकीच्या गाड्या अडवून रास्तारोको आंदोलन करण्यात आले.म्हाळादेवी गावातून डावा आणि उजवा असे दोन्ही कालवे गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच दोन्ही कॅनॉल लगत शेतकऱ्यांच्या शेताजवळील खड्डे बुजविणे, कॅनॉलला पाणी सोडले असताना ज्या लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पाणी पाझर होऊन नुकसान होते,त्या पिकांची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही ती मिळावी.
कारवाडी येथील रामनाथ कृष्णा हासे यांच्या वस्तीसमोर बांधलेल्या लाखो रुपयांच्या पुलावरून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी ये-जा करता येत नाही.सात ते आठ महिन्यांपूर्वी त्याबाबत पत्र व्यवहार केला होता,त्यावर या रस्त्याबाबत जमीन संपादन करणे बाबत काय निर्णय झाला.
कॅनॉलवर क्रॉसिंग ब्रिज बाबत काय कार्यवाही झाली व किती पूल मंजूर आहे,कॅनॉलमधून काढलेला भरावा व मुरूम विक्री करून दिला जातो,परंतु त्यांना शेती लगत खड्डे भरण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात.
त्यांच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे परत मिळावे,कॅनॉलमध्ये काँक्रीटचे अस्तरीकरण चालू आहे,ज्या ठिकाणी रस्त्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी घाटासारख्या पायऱ्या करण्यात याव्या,त्या ठिकाणी संरक्षण जाळ्या किवा बॅरिकेट करण्यात यावी,कॅनॉलचे अस्तरीकरनाचे काम चालू आहे हे काम निकृष्ट दर्जाचे असून त्यावर पाणी सुद्धा मारले जात नाही.
कारवाडीकडे दत्त मंदिराजवळ पुलाच्या खाली उतारा लगत रस्त्याला रेलिंग पाईप टाकण्यास सांगितले होते त्याचे काय झाले,भाऊसाहेब हासे यांच्या शेतीलगत संरक्षक भिंत बांधण्यात यावी,तर आमच्या मागण्या मंजूर होणार नाही, तो पर्यंत कॅनॉलचे काम सुरू होऊ देणार नाही,असा इशारा या आंदोलनातून संतापलेल्या ग्रामस्थांनी दिला.
गावचे माजी सरपंच प्रदीप हासे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा कॅनॉलचे काम पूर्ण होऊ देणार नाही,असा इशाराही म्हाळादेवी ग्रामस्थानी दिला आहे.
या आंदोलनासाठी माजी सरपंच प्रदीप हासे, शांताराम संगारे, धोंडीराम हासे, विलास हासे, अमित हासे, प्रकाश हासे, गणेश हासे, बंडू हासे, बाळासाहेब हासे, किरण उघडे, संजय हासे, प्रेमराज हासे, अनिल मुंडे, अशोक हासे, दीपक हासे, भागवत हासे, आशा हासे, पुष्पा हासे, विजया हासे, उज्वला हासे, अलका हासे उपस्थित होते.