आहिलयानगर जिल्ह्यातल्या बारा विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी किरकोळ घटना वगळलया तर इतर ठिकाणी एकदम शांततेत आणि उत्साहात मतदान पार पाडले.
मतदान केंद्रांवर सकाळी जास्त गर्दी नव्हती पण दुपारनंतर शहरातील मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी करून उत्साहात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.म्हणून मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मतदानाचा टक्का वाढून जास्त मतदान झाले आहे.
नगर शहरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत २७ लाख १५ हजार १० मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पडले.म्हणजे एकूण सरासरी ७१.७५ टक्के मतदान झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.मागील निवडणुकीच्या (६९.४२ टक्के) तुलनेत हे मतदान २ टक्क्यांनी जास्त आहे तरी मतदानाची अंतिम आकडेवारी उद्या स्पष्ट होईल.
दरम्यान,अहिल्यानगर शहरातील बारा मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदान यंत्रांत बंद झाले आहे.त्यामुळे आता बारा मतदार संघांमध्ये कोण कोणते उमेदवार विजयी होतील ते बघणे उत्सुकतेचे राहणार आहे.
या निवडणुकीनंतर कोण कोण विधानसभेवर जाईल,याचा निर्णय शनिवारी (दि. २३) होणार आहे.त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेचे बारा मतदारसंघ आहेत त्यापैकी,१५१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीत ३७ लाख ८३ हजार ९८७ लोकांनी मतदान केले असून, ३ हजार ७६५ मतदान केंद्रांवर त्यांची मतदानाची सोय करण्यात आली होती.
जिल्ह्यातल्या सगळ्याच मतदान केंद्रांवर सकाळी साडेसहा वाजता मॉकपोल करण्यात आला.त्यासाठी ५० ईव्हीएम मशिन्सचा वापर करण्यात आला होता.सकाळी ७ वाजता प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली.
सकाळी ७ पासून सकाळी ९ पर्यंत मतदान केंद्रांवर जास्त गर्दी नव्हती.या कालावधीत २ लाख २३ हजार ७५८ मतदारांनी मतदान केले. सरासरी ५.९१ टक्के मतदानाची नोंद झाली. शिर्डी मतदारसंघात सर्वाधिक ८.१९ टक्के मतदान झाले.