विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कच्या राहुरी विभागाच्या दुय्यम निरीक्षकांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई केली.

या कारवाईत एकूण ७ गुन्हे नोंद करण्यात आले असून २८९० ली. रसायन व १३० ली. हातभट्टी गावठी दारू व एक दुचाकी होंडा सीबी शाईन मोटारसायकल असा एकूण १ लाख ९२ हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील रसायन व गावठी दारू या पथकाने नष्ट करत याप्रकरणी एकूण ७ जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क राहुरी विभागाचे निरीक्षक चंद्रकांत सीताराम रासकर यांच्या पथकाने राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे नष्ट केले.

सदर कारवाईमध्ये एकूण ७ गुन्हे नोंद करण्यात आले असून २८९० ली. रसायन व १३० ली. हातभट्टी गावठी दारू नष्ट करण्यात आले.

सदर गुन्ह्यात एक दुचाकी होंडा सीबी शाईन जप्त करण्यात आली व मुद्देमालाची एकूण किंमत रु.१,९२,४५०/- रु इतकी आहे. सदर कारवाईत एकूण ७ आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क राहुरी विभागाचे निरीक्षक चंद्रकांत सीताराम रासकर यांनी दिली.

ही कारवाई राज्य उत्पादनचे विभागीय उपआयुक्त पुणे विभाग सागर धोमकर, अहिल्यानगरचे अधीक्षक प्रमोद सोनोने, प्रवीण कुमार तेली, उपअधीक्षक, रा.उ.शु अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत सीताराम रासकर, निरीक्षक, राहुरी विभाग, दुय्यम निरीक्षक शितलकुमार पाटील, दुय्यम निरीक्षकएम.बी.साळवे, स.दु. नि.एस.बी. विधाटे, एन.पी.बुरा, एस. जी. गुंजाळ, ए. ए. कांबळे, कु. जे. आर. पठाण, एस.बी.घुले, श्रीमती. एस.बी. डोंगरे, कु. एस. आर. पठाण, श्रीमती ए. एस. वाघमोडे यांनी सहभाग घेतला.