सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नेवासा नगरपंचायतीच्या तिर्थक्षेत्र ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांच्या निषेधार्थ गुरूवारी ‘मी नेवासकराच्या’ वतीने गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.यावेळी समर्पण संघटनेचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
बांधकाम विभाग आणि नेवासा नगरपंचायतीच्या चुकीच्या धोरणांमुळे तिर्थक्षेत्र ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची वाताहत झाली आहे.रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन भाविकांना मनःस्ताप होत आहे.
त्यामुळे प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी मी नेवासकर संघटनेच्या वतीने रस्त्यावर जागरण गोंधळ घालून लक्ष वेधण्यात आले.जर यावर संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेवर पडलेले खड्डे आणि नगरपंचायतीची फुटलेलया पिण्याच्या पाईपलाईन दुरुस्ती न केल्यास यापेक्षा ही तिव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा संघटनेचे शांताराम गायके यांनी दिला.
नेवासा शहरातील उद्भभवणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यांना आवाज देवून पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न असो घनकचरा व्यवस्थापन, किंवा आरोग्य विभागाचा तिर्थक्षेत्र विकासासाठी अशा अनेक प्रकारच्या समस्यांना वाचा फोडुन संबंधित विभागाचा निषेध व्यक्त केला.
तसेच अधिकाऱ्यांना जाब विचारून नेवासा शहराच्या हितासाठी सदैव नेवासकरांसोबत राहुन काम करत राहणार असे उद्गार यावेळी आंदोलनात डॉ. करणसिंह घुले यांनी केले.
या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन नेवासा नगरपंचायतचे अधिकारी म्हस्के यांनी निवेदन स्वीकारले.तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची नगरपंचायतीमध्ये बैठक घेऊन खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल,अशी ग्वाही म्हस्के यांनी आंदोलकांना यावेळी दिली.
यावेळी विकास चव्हाण, संतोष राजगिरे, संतोष चव्हाण, अनिल सोनवणे, राजु कनगरे, रामदास ईरले, गणेश चांगले, प्रकाश चव्हाण, मनेश चव्हाण, बबलू शेख, शुभम चव्हाण, व जागरण गोंधळाचा कार्यक्रम करणारे लक्ष्मण गोंधळी यांच्या ताफेचा शहरातील नागरिकांनी रात्रीचा होणार जागरण गोंधळाचा कार्यक्रम दिवसा होऊन ते प्रशासनचा विरोध करण्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.