यंदा महाराष्ट्रात या वर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला.त्यामुळे यावर्षी झालेल्या या पावसामुळे थंडी देखील जास्त राहनार असून थंडीचा जोरही जास्त वाढणार आहे.
मागील आठ दिवसांपासून नगर शहरात थंडीचा कहर सुरू झाला असून डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक थंडी राहणार आहे.त्यामुळे नगरकरांना घराबाहेर पडणेही कठीण होणार आहे असे तज्ञांनी सांगितले.
नगर तालुक्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे नगरकरांनी थंडी पासून आराम मिळावा यासाठी गावात जागोजागी व शेत शिवारात रात्री शेकोट्या पेटवून गरमीची ऊब घेण्याची मजा लूट आहेत.
अचानक बदल झालेल्या या वातावरणामुळे बरेच जण आजारी पडत आहेत.त्यामुळे शहरातल्या दवाखान्यातही गर्दी दिसू लागली आहे.
थंडीमध्ये शेकोटी जवळ बसून नगरीकांमध्ये निवडणुकीच्या निकालाच्या गप्पा रंगत आहेत.रब्बी हंगामाच्या पेरणीत बरेच शेतकरी दिवसा सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे रात्री शेतात जाऊन शेत भिजविण्यावर भर देत आहेत.
त्याचप्रमाणे उगवून आलेल्या रब्बी पिकांना पाणी देत असताना थंडी जाणवताच एक-दोन शेतकरी एकत्र येऊन शेकोटी पेटवून आसरा घेतात.
नगर शहरातील कापड दुकानांमधे सुद्धा लहान मुले, वयोवृद्ध स्वेटर, कानटोपी, मफलर, रुमालचा, ब्लॅकेट इत्यादी उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिक रात्री जागोजागी गावात शेकोट्या पेटवून राजकीय गप्पा मारत असल्याचे दिसून येत आहे. यात कोणत्या पक्षाचा आमदार निवडून येईल, अपक्षांना किती मते पडतील,आपल्या गावातून कोणाला अधिक लीड मिळेल, या विषयांवर कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक गप्पा मारत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.