नगरपरिषद हद्दीमध्ये ठेकेदारामार्फत शहराची स्वच्छता केली जाते.मात्र,ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे शहरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.नगरपरिषद ठेकेदाराला लाखो रुपये दरमहा देत असून,त्या तुलनेत शहराची स्वच्छता होत नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
नगरपरिषद हद्दीत आजही ठिकठिकाणी अस्वच्छतेचे चित्र पसरले आहे.घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत असून,त्यामुळे साथीचे रोग पसरण्यास मदत होत आहे.असे असूनही ठेकेदाराकडून स्वच्छतेबाबत अक्षरशः दुर्लक्ष झालेले आहे.
वास्तविक पाहता स्वच्छतेबरोबर वेळोवेळी डासांचा प्रादुर्भाव वाढू नये त्यासाठी औषध फवारणी होणे गरजेचे आहे. मात्र,तेसुद्धा ठेकेदाराकडून केले जात नाही.
घंटा गाडीद्वारे शहरातील कचरा गोळा करण्याचे काम होत असले,तरी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी,मोकळ्या जागेवर, रस्त्याच्या बाजूला असलेला कचरा साफ करण्यात येत नाही.
शहरातील शासकीय कार्यालये नगरपरिषदेने स्वच्छता करणे गरजेचे आहे.मात्र या कार्यालयांकडे स्वच्छता ठेकेदार कित्येक महिने फिरकला देखील नाही.परिणामी त्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरून दुर्गंधी पसरली आहे.
त्यामुळे साथीच्या आजारांचा फैलाव होण्यास मदत झाली आहे.स्वच्छतेचे काम ठरून दिल्याप्रमाणे होत नसल्याने पाथर्डी शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.नागरिकांकडून विविध सेवा देण्याच्या नावाखाली कर आकारला जातो.
परंतु भरमसाट कर घेऊनही नागरिकांना स्वच्छतेबाबत सेवा मिळत नाही.त्यामुळे ठेकेदाराच्या कारभारात सुधारणा करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पाथर्डी नगरपरिषदेत ठेकेदाराची मनमानी सुरू असून,स्वच्छते बाबत दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.शहराची स्वच्छता प्रभावी होऊन लोकांना घाणीचे साम्राज्यातून बाहेर काढावे असे राष्ट्रवादी पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष देवा पवार यांनी सांगितले आहे.