नगर शहर हे विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे शहर असून मागच्या काही वर्षांपासून नगर शहर हे मोठ्या प्रमाणात विस्तारत असून प्रत्येक भागात वसाहतींचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे नगर शहरातून दररोज सुमारे १५० टन कचरा वेचला जातो.
कचरा वेचण्याचा कामाला एक दिवस आराम दिला तर जागोजागी कचऱ्याचे ढिगारे झाल्याचे तुम्हाला बगायला मिळतील.त्यामुळे कचरा वेचण्याच्या कामाला अधिक वेग यावा यासाठी क्युआर कोड प्रणालीचा वापर नगरपालिकेद्वारे करण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात कचरा संकलनासंदर्भात क्युआर कोड लावण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या प्रणालीच्या माध्यमातून मनपा प्रशासनाला कचरा संकलनातील नियमितता तपासता येणार आहे.
तसेच कोणत्या भागात घंटागाडी गेली नाही हे तत्काळ समजणार आहे. शहरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या दृष्टीने हा चांगला उपक्रम आहे.नागरिकांनीही ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून तो घंटागाडीतच टाकावा.
शहरातील सर्व भागात नियमित,वेळेत आणि गुणवत्तापूर्वक कचरा वेचला जातो कि नाही हे तपासण्यासाठी आता शहरातील प्रत्येक घरावर, तसेच खासगी व सरकारी आस्थापनांना क्यूआर कोड लावले जाणार आहेत.शासनाने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेमार्फत घरोघरी क्युआर कोड लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दैनंदिन कचरा संकलनाच्या मॉनिटरिंगसाठी शहरात आयसीटी बेस प्रणाली कार्यरत होणार आहे.या अंतर्गत शहरातील मालमत्तांवर, तसेच ओला, सुका कचरा साठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डस्टबीनवर विशिष्ट कोड लावण्यात येणार आहे. घंटागाडी आल्यानंतर कचरा वेचणारे कर्मचारी कचरा घेतल्यानंतर हा कोड स्कॅन करतील.
या प्रणालीमुळे नियोजित ठिकाणी घंटागाडी गेली की, नाही याबाबत मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला माहिती मिळेल.कचरा संकलनासाठी अहिल्यानगर शहरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरांवर क्युआर कोड बसविण्याचे काम सुरू आहे.
आमच्या भागात वेळेवर आणि नियमित घंटागाडी येत नाही,अशा तक्रारी नागरिकांद्वारे केलीत जातात.कधी घंटागाडी गेली तरी ज्यांचा कचरा टाकायचा राहिला आहे ते लोक तक्रारी करतात.
आता क्युआर कोडच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी घंटागाडी गेली की, नाही हे ऑनलाईनरीत्या मनपा प्रशासनाला समजणार आहे.त्यामुळे कचरा संकलन कामात पारदर्शकता येणार आहे.