आम्ही दोघे मिळून नगर जिल्हा वेगळ्या वळणावर नेऊन ठेवू असे मत खासदार निलेश लंके यांनी मांडले.तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात खासदार निलेश लंके बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.
गेल्या तीस वर्षां पासून प्रताप ढाकणे शेवगाव पाथर्डी या मतदारसंघात जनसामान्यांच्या हितासाठी संघर्ष करत आहेत, त्यांच्यामध्ये राज्याचे नेतृत्व करण्याचे गुण आहेत. तसेच अभ्यासू पणे विधिमंडळात या भागाचे प्रश्न ते मांडू शकतात, त्यामुळे एकदा प्रताप ढाकणे यांना जनतेने संधी द्यावि.
यावेळी शेवगावचे हरीश भारदे, शिवशंकर राजळे, वजीर पठाण, किरण शेटे पाटील, दिनकर पालवे माधवराव काटे, बाळासाहेब कचरे, काँग्रेसचे नासिर शेख, ठाकरे गटाचे भारत लोहकरे, बंडू पाटील बोरुडे, सिताराम बोरुडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये बोलताना प्रतापराव ढाकणे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने राज्यातील जनतेची पिळणूवणूक केली आहे. दहा वर्षांपूर्वी दाखवलेले स्वप्न आज कुठे आहे.
महागाई वाढली, बेरोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.सामाजिक वातावरण बिघडवली मतांच्या राजकारणासाठी महाराष्ट्र धर्म बुडवला जातीभेदाचे राजकारण करून सत्ता मिळवण्यासाठी भाजपने वाटेल ते केले.
नगर जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे या मतदारसंघातील विकासाचे अनेक प्रश्न्न प्रलंबित असून भगवानगड पाणी योजना अडीच वर्षांपूर्वी आम्ही मंजूर करून आणली त्याचे नारळ विरोधकांनी फोडले मात्र ते प्रत्यक्षात येऊ शकली नाही.
शेवगाव पण योजनेचे नारळ भाजपमधील दोन गट फोडतात मला या मतदारसंघात शेवगाव पाथर्डीच्या पूर्व भागाला पाणी मिळवून द्यायचे आहे मागच्या पंधरा वर्षात एकही रचनात्मक काम लोकप्रतिनिधींकडून झालेले नाही.
कोटींची आकडेवारी विरोधकांकडून सांगितली जाते मात्र ठोस काम कुठे आहे ते त्यांनी एकदा दाखवून द्यावे, नगर जिल्हा बँकेतही अनेक गैरकारभार सुरू असून स्वतःच्या कारखान्यांना कर्ज मिळविण्यासाठी जिल्हा बँकेचा कारभार वाटेल तसा हाकला जात आहे.
संगणीकृत करण्यासाठी बँकेने मोठा घोटाळा केला मी या विरोधत आवाज उठवला तर बँकेने मला कायदेशीर नोटीस पाठवली, हिम्मत असेल तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि जिल्हा बँकेचा कारभाराचा दूध का दूध आणि पाणी चा पाणी होऊ द्या.
ही बैंक दोन-चार जणांच्या मालकीची नसून ती सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक आहे हे लक्षात ठेवा असे आव्हान ढाकणे यांनी भाषणात शेवटी केले.
यावेळी अभिजीत गर्जे, बंडू अकोलकर, कल्याणराव फुंदे, अरुण धस, सचिन पालवे, कांतीलाल कोठे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने ढाकणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.