गुन्हेगारी रोखण्यासाठी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती केली जाणार आहे.२०१९ नंतर खरेदी केलेल्या नव्या वाहनांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आढळून न आल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वाहन चोरीचे प्रमाण अलीकडे वाढले आहेत.मोटारसायकल चोरीचे दररोज चार ते पाच गुन्हे दाखल होतात.चोरीच्या वाहनांची नंबर प्लेट काढून टाकली जाते. विना नंबरच्या दुचाकीचा गुन्हे करण्यासाठी वापर केला जातो.
त्यामुळे आता राज्य मार्ग परिवहन विभागाने जुन्या वाहनांना देखील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे सक्तीचे केले आहे. तसा आदेश या विभागाने काढला आहे.त्यामुळे वाहने सुरक्षित राहतील या आदेशाची अहिल्यानगर आरटीओ कार्यालयाकडून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
अनेक वाहन चालक नवीन नंबर प्लेट काढून दादा, मामा, काकाच्या नावाने नवीन नंबर प्लेट बसवितात.त्यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या मूळ उद्देशालाच मूठमाती मिळत आहे.२०२९ नंतर खरेदी केलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणे गरजेचे असून, नंबर प्लेट आढळून न आल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
वाहन चोरीला गेल्यास तपास कार्यात होलोग्रामची मोठी मदत होणार आहे. मूलतः हाय सिक्युरिटी नंबर प्लेट काढता येणार नाही.काढली तरी दुचाकीचे किंवा चारचाकी मडगार्ड पूर्णपणे उखडून निघते. नवीन मडगार्ड टाकताना चोरीचा प्रकार तत्काळ समोर येणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेली ही नंबर प्लेट ट्रॅम्परप्प्रुफ असते.या नंबर प्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचा होलोग्राम व वाहन क्रमांकाच्या काळ्ळ्या तिरप्या ओळीत इंडिया (इंग्रजीतील शब्द) असे लिहिलेले असते.वाहनावर एकदा ही नंबर प्लेट बसविल्यानंतर ती काढता येत नाही.
शहरासह जिल्ह्यात दुचाकी व चारचाकी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी एजन्सीकडे नेमणूक करण्यात आलेली आहे.एजन्ट वितरकांमार्फत नंबर प्लेट बसवून देतात.नंबर प्लेट बसविल्यानंतर नवीन वाहन रस्त्यावर येते.नंबर प्लेट न बसविता नवीन वाहने रस्त्यावर आल्यास कारवाई करण्यात येत असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले.