शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम १ डिसेंबरपासून सुरू झाला आहे.शेतकऱ्यांची पीक पाहणी करण्यासाठी यापूर्वी ई-पीक पाहणी मोबाइल अॅप उपलब्ध होते.केंद्राच्या धोरणानुसार आता या अॅपमध्ये काही तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे आता ई-पीक पाहणी डीसीएस नवीन रूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शेतकरी स्वतः पिकांची नोंदणी ई- पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे नोंदवत आहेत. आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदविलेली नाही ती तलाठ्यांमार्फत करण्यात येत होती.त्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्यासाठी तालुक्यात ८७ गावांसाठी १४० सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रत्येक गावासाठी एक सहायक उपलब्ध राहणार आहे.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत ई-पीक पाहणी करावी,असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.
नव्या डीसीएस अॅपमध्ये पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य, यामध्ये पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक आहे.शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबंधित समस्या सोडविण्यासाठी सहायक उपलब्ध असेल.
या अॅपवरून तुम्ही कायम पड,बांधावरची झाडेही नोंदवू शकता,तसेच गावातील खातेदारांची पीक पाहणीची माहितीही पाहू शकता.तसेच ही माहिती ४८ तासांच्या आत दुरुस्त किंवा नष्ट करता येते.
जामखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत ई- पीक पाहणी करून घ्यावी.तालुक्यात ८७ गावांसाठी १४० सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे.ई-पीक पाहणी नोंदणी करता वेळेस काही अडचण आल्यास या सहायकांची मदत घ्यावी.
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद या सुविधांचा लाभ घेण्यासाठी डीसीएस मोबाइल अॅपमध्ये नोंद असणे यापुढे आवश्यक राहणार आहे.
नव्या डीसीएस अॅपमध्ये पीक पाहणी करताना ५० मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य आहे. ५० मीटरपेक्षा दूरचा फोटो चालणार नाहीत.यामध्ये पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक आहे.
ई-पीक मुदतीत करा ई-पीक पाहणी नोंदणी न केल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे,तसेच नैसर्गिक आपत्तीने शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ठरावीक मुदतीत करावी.