Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष पाहता केंद्रातील सरकारने देशात सुरू असलेली कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला. कांदा निर्यात पुन्हा एकदा सुरू झाली. कांदा निर्यात सुरू झाल्याने याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल आणि बाजारभावात सुधारणा होणार अशी आशा सार्यांनाच होती.

मात्र कांदा निर्यात सुरू झाल्यानंतरही कांद्याचे बाजार भाव दबावात असल्याचे चित्र आहे. केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांची नाराजगी दूर करण्यासाठी निर्यात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. निर्णय झाला त्या दिवशी कांदा बाजार भावात मोठी सुधारणा झाली.

परंतु निर्यातीसाठी सरकारने काही जटिल नियम लावून दिले आहेत. शिवाय कांदा निर्यात शुल्क देखील आकारले जात आहे. म्हणजेच सरकारने कांदा निर्यात सुरू जरी केली असली तरी देखील अप्रत्यक्षपणे निर्यात बंदी सुरु आहे.

याचा परिणाम म्हणून नाशिक, अहिल्यानगर या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांसमवेतच संपूर्ण राज्यभर कांद्याचे दर दबावात आहेत. दरम्यान आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा बाजारभाव

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात एक नंबरच्या कांद्याला किमान 1100, सरासरी 1100 आणि कमाल 1650 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान शंभर, कमाल 1900 आणि सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटाल असा भाव मिळाला आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 200, कमाल 2001 आणि सरासरी अकराशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 500, कमाल 1800 आणि सरासरी 1400 रुपये भाव मिळाला आहे.

कोपरगाव-शिरसगाव तळवाणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 500, कमाल 1725 आणि सरासरी 1625 असा भाव मिळाला आहे.