एसटीच्या प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट बुक करता यावे, यासाठी ऑनलाईन तिकीट प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.१ जानेवारी २०२४ पासून एसटीच्या तिकीटाचे आरक्षण प्रणालीची आधुनिकीकरण केले आहे.

या ऑनलाईन सेवेद्वारे मोबाईलवरदेखील तिकीट बुक करता येत आहे.या सेवेला ग्राहकांनी कमालीची पसंती दिली आहे. त्यामुळे सुट्या पैशांची अडचण दूर झाली असून त्यामुळे वाद विवादही कमी झाले आहेत.

त्यामुळे एसटीच्या तिकीटांचे आरक्षण आता झटपट होत आहे. पूर्वीप्रमाणे एसटीचे तिकीट ऑनलाईन बुक करताना अडचणी येत नाहीत. एसटीच्या तिकीट आरक्षणासाठी असलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आधुनिकीकरण झाले आहे.

१ जानेवारी २०२४ पासून एसटीच्या तिकीटाचे आरक्षण प्रणालीची आधुनिकीकरण केले आहे. त्यामुळे एसटीच्या तिकीटांचे आरक्षण आता झटपट होत आहे. पूर्वीप्रमाणे एसटीचे तिकीट ऑनलाईन बुक करताना अडचणी येत नाहीत.

सध्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे सुमारे १० हजार तिकीटे काढली जात आहेत. एसटी प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळाबरोबरच मोबाईल अॅपचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

सुट्या पैशांची समस्या निकाली काढण्यासाठी महामंडळाने वाहकाच्या हाती डिजिटल तिकीट मशीन दिले. त्यानंतरही काही वाहकांचा पूर्वापार व्यवहारांसाठी अट्टहास कायम दिसतो. ऑनलाइन तिकीट घेताना बहुतांश वेळा नेट प्रॉब्लम येतो.

या तांत्रिक कारणाचा बाऊ करत वाहक रोख तिकीट घेण्याचा दबाव टाकतात. व्यवहार अडकेल, तुम्हालाच त्रास होईल, लवकरच करा मला इतरांचेही तिकीट काढायचे आहेत, अशी पठडीतील वाक्य ऐकावयास मिळतात.याबाबत वाहकांचे वरिष्ठांनी प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रवासी सांगतात.