आज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून फक्त काही तासातच कोण कोण बाजी मारणार आहे हे कळणार असून या बाराही मतदार संघातील लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लोकांमध्ये जशी उत्सुकता आहे तशीच उत्सुकता सर्व दिग्गज मातब्बर उमेदवारां बरोबरच त्यांच्या समर्थकांत धाकधूक वाढली,यावेळी कोण कोण विधानसभेला कोण बाजी मारणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.पुढच्या पाच वर्षांसाठी जिल्ह्याचे कोणते बारा नेते असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी जिल्ह्यातील बारा मतदारसंघ आहेत.या मतदारसंघांतून विधानसभेवर जाण्यासाठी जिल्हाभरातील १५१ उमेदवारांनी प्रयत्न केले आहे.या निवडणुकीसाठी सर्वच मतदारसंघांत मतदारांचा भरपूर उत्साह होता.त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली.
नवीन मतदार नोंदणी आणि झालेल्या भरघोष मतदानाचा कोणाला फायदा होणार याचा निकाल शनिवारी दुपारपर्यंत काळणार आहे,उमेदवारांच्या मतदारसंघांत यंदा चुरस दिसत आहे.नवख्या उमेदवारांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे मतदारसंघांच्या निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे.
अकोले मतदारसंघात तिरंगी लढत आहे.कोपरगाव मतदारसंघात आशुतोष काळे आघाडीवर असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप वर्पे हे देखील लढत देत आहेत.
श्रीरामपूर मतदारसंघात सध्या तिरंगी लढत असून, या मतदारसंघातील जनता कोणाला कौल देते याची उत्सुकता ताणली गेली आहे.नेवासा मतदारसंघात आमदार शंकरराव गडाख यांनाही विठ्ठल लंघे आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आव्हान दिले आहे.
शेवगाव मतदारसंघात माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील रिंगणात उतरल्याने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या मतांवर परिणाम होईल का, याकडेही लक्ष लागले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांनी देखील चांगली वातावरण निर्मिती केली आहे.त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात पहिल्यांदा आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदा प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या काही दिवसांत राम शिंदे यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे राम शिंदे पराभवाचा वचपा काढतात की रोहित पवार दुसऱ्यांदा बाजी मारतात,याची उत्सुकता वाढली आहे.
पारनेर मतदारसंघात राणी लंके पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यापुढे देखील मोठे आव्हान आहे. माजी आमदार विजयराव औटी आणि संदेश कार्ले हे दोन उमेदवार किती मते घेतात.या तालुक्याचा आमदार कोण हे थोड्याच वेळात ठरणार आहे.
श्रीगोंदा मतदारसंघात शिवसेनेच्या अनुराधा नागवडे, भाजपचे विक्रम पाचपुते आणि अपक्ष उमेदवार राहुल जगताप अशी तिरंगी लढत आहे. अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी मतदारसंघात तगडे आव्हान निर्माण केले. त्यामुळे या मतदारसंघातील जनतेचा कौल कोणाकडून लागणार हे काही तासांत समोर येणार आहे.
अहमदनगर शहर मतदारसंघात दुरंगी लढत आहे.विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी अभिषेक कळमकर यांना शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांची चांगली साथ मिळाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार कोणाला विधानसभेत पाठवितात याची उत्सुकता वाढली आहे.
या बारा मतदारसंघांतून विजयी झालेले आमदारच जिल्ह्याचे कारभार सांभाळणार आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील बाराही मतदार संघातल्या मतदारांना पुढील पाच वर्षांसाठी कोण कोण निवडून येणार याची उत्सुकता ताणली गेली आहे.