निवडणुकांच्या काळात नियोजनपूर्वक केलेला प्रचार विजयासाठी अत्यंत महत्वपूर्ण असतो.त्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे यांचा प्रचार करण्यासाठी भाजपाचे विधानसभा संयोजक सचिन देसरडा, उद्योजक प्रभाकर शिंदे व लाडकी बहिण योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कष्ट घेतलेले अब्दुल शेख हे राजकीय किंगमेकर ठरले आहे.
प्रभाकर शिंदे,अब्दुल शेख,सचिन देसरडा यांची प्रचार यंत्रणा यशस्वी झाल्यामुळे आ.लंघे यांचा विजय होऊन त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांनी नियोजनपूर्वक प्रचाराची जबाबदारी घेत यशस्वीपणे पार पडली.
नेवासा फाट्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर घोडेगाव येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची तर कुकाण्यातील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची सभा लंघे यांच्या विजयासाठी प्रभावी ठरली.
घोडेगाव मधील सभा देसरडा यांच्या नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पडली.मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेसाठी देसरडा यांना पंचगंगाचे संचालक प्रभाकर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
कुकाण्यातील दानवे यांच्या सभेसाठी अब्दुल शेख यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.घोडेगाव, सोनईमध्ये सचिन देसरडा यांनी लंघेसाठी मतदारांपर्यंत महायुतीच्या जनहिताच्या योजनाची माहिती दारोदारी पटवून देत नागरिकांपर्यंत पोहचवली.नेवासा तालुक्यातील सर्व सभा, प्रचारफेऱ्या यांच्या नियोजनाची जबाबदारी देसरडा यांनी उत्कृष्ट केल्यामुळे लंघे यांच्या विजयात भर पडली.
लंघे यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता तेव्हापासून ते लंघे निवडून येईपर्यंत देसरडा यांनी केलेली राजकीय व्युहरचना लंघे यांच्यासाठी लाभदायी ठरली.त्याच प्रकारे कुकाण्यातील अब्दुल शेख यांनी लाडकी बहिण योजनेसाठी २० हजारहून अधिक महिलांची अर्ज भरण्यासाठी मदत केली.
लंघे यांच्या विजयासाठी अब्दुल शेख यांनी स्वतःला मिळालेली राष्ट्रवादीची उमेदवारी सुद्धा मागे घेत आ.लंघे यांना विजयासाठी पाठिंबा दिला.नेवासा तालुक्यातील महायुतीच्या सभेसाठी महिलांनी केलेल्या लक्षणीय गर्दीमुळे देखील लंघे यांचा विजय सुकर झाला.