अकोले तालुक्यातील भंडारदरा या धरणाची उभारणी ब्रिटिशांनी केली असून त्यावेळी ब्रिटिशांना आराम करण्यासाठी भंडारदरा धरणावर एक व धरण शाखेच्या कार्यालयाजवळ एक,असे दोन विश्रामगृह बांधण्यात आले होते.
एके काळी हे विश्रामगृह अधिकाऱ्यांसाचे राहण्याचे एक ठिकाण होते.या ठिकाणी कायम कर्मचारी असायचे.विश्रामगृहाच्या बाजूने वेगवेगळ्या प्रकारचे झाडे होते.आजूबाजुच्या परिसराला फुल झाडांनी वेढा दिलेला असायचा.विश्रामगृहाच्या परिसरात गेले तरी मन प्रसन्न व्हायचे.
भंडारदरा धरणाच्या भिंतीवर असलेले विश्रामगृह चांगल्या स्तिथीत आहे कारण इथे कायमस्वरूपी विश्रामगृहाची देखभाल होत असते त्यामुळे विश्रामगृह अजूनही सुस्थितीत आहे.
पण या उलट परिस्थिती भंडारदरा धरणाच्या कार्यालयाजवळ असणाऱ्या विश्रामगृहाची आहे.हे विश्रामगृह इतक्या वाईट परिस्थितीत आहे कि ते मोडकळीला लागले आहे.
विश्रामगृहात असलेले फर्निचर मोडकळीला आलेले आहे.त्यातील काही फर्निचर कुठे गायब झाले याचा तपास अजूनही कोणालाच लागलेला नाही. विश्रामगृहावरील कौले गायब झाली असून या कौलाच्या जागी गवत उगवले आहे.
विश्रामगृहाच्या आजूबाजूला घाण वाढली असून कचरा आणि काटेरी झुडपांची संख्या वाढली आहे.विश्रामगृहाची ही अवस्था बघून या विश्रामगृहामध्ये दारुडे लोक दारू पिण्यासाठी इथे येतात.विश्रामगृहामध्ये असलेल्या तुटक्या फुटक्या टेबलांवर दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात.
गेल्या सहा ते सात वर्षापासून या विश्रामगृहाला उतरती कळा लागली आहे असे आपण म्हणू शकतो.आता सध्याची परिस्थिती खूप वेगळी झाली आहे.
आता तिथली परिस्थिती इतकी घाण झाली आहे कि विश्रामगृहाच्या भिंती अनेक ठिकाणी पडलेलया असून विश्रामगृहाचे दरवाजे चोरीला गेलेले आहेत.
भंडारदरा धरण शाखेच्या कार्यालयापासून हे विश्रामगृह फक्त अर्ध्या मिनिट जवळ असून फक्त धरण शाखेने केल्ल्या दुर्लक्षामुळे हे विश्रामगृह खराब झाले आहे.
त्यामुळे विश्रामगृहाच्या दुर्दशेला कारणीभूत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी भंडारदरा परिसरातून रोज होत आहे.