अहिल्यानगर येथील एसबीआय चौकातील संरक्षण खात्याच्या वेतन लेखा कार्यालयात पेन्शनर कर्मचाऱ्यांसाठी स्पर्श व डिजिटल जीवन प्रमाण पत्राबाबत जागृती होण्यासाठी पुणे येथील रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (सेना) यांच्या मार्गदर्शनानुसार नगरमध्ये एकदिवसीय मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या वेळी एमआयसी अँड एसचे प्रमुख ब्रिगेडिअर रसूल डिसूजा हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते आणि उपस्थितांशी चर्चा करत होते त्यावेळी ते बोलत होते.आपण सर्वजण एकाच परिवाराचा भाग आहोत आणि आपण सर्वानी सोबत राहून काम करणे किती गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

पेन्शनर्सचे थकीत असलेले सर्व पेमेंट वेळेवर व्हावे यासाठी वेतन लेखा कार्यालय बांधील असून या कार्यालयाचे कार्य एकदम उत्तम आहे असेही त्यांनी सांगितले आहे.या मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सेवेचा सर्व पेन्शनर्सने लाभ घ्यायला पाहिजे,असेहि आवाहन एमआयसी अँड एसचे प्रमुख ब्रिगेडिअर रसूल डिसूजा यांनी केले.

या मेळाव्या मार्फत २०० पेन्शनर्सच्या समस्यांचे समाधान करण्यात आले.मोहरीर यांनी, स्पर्श ही तांत्रिकदृष्ट्या सक्षम व उत्कृष्ट पद्धती असून,आतापर्यंत ३२ लाख पेन्शनर्सपैकी ३० लाख पेन्शनर्सची माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

या पद्धतीत तुम्ही घरी बसूनही मोबाईलद्वारे प्रमाणीकरण करू शकता.हा मेळावा एकदिवसीय असले तरीही या कार्यालयात स्पर्श सेवा केंद्र कार्यालयीन वेळेत कायम सुरू असते असे त्यांनी सांगितले

या मेळाव्या प्रसंगी कर्नल संजय कुमार, तसेच ले. कर्नल पाठक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विकास मोहरीर होते.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लेखाधिकारी अशोक कुमार दास यांनी, तर आभार संतलाल सिंह यांनी मानले.

या वेळी वेतन लेखा कार्यालयाचे एमआयआर विभागाचे प्रमुख रक्षा लेखा सहायक नियंत्रक विकास मोहरीर, तसेच एसीआर विभागाचे प्रमुख रक्षा लेखा सहायक नियंत्रक व्ही. पांडुरंगा, वरिष्ठ लेखाधिकारी दीपेंद्र कुमार, आर्मर्ड कोअर सेंटरचे कर्नल संजयकुमार महापात्रा, एमआयसी अँड एसचे लेफ्टनंट कर्नल ओ. पी. पाठक इत्यादी उपस्थित होते.